मनिला- हाताने मैला उचलून नेण्याच्या प्रथेविरोधात लढा देणारे बेझवडा विल्सन व कर्नाटकचे गायक टी. एम. कृष्णा यांना यंदाचा प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. विल्सन, कृष्णा यांच्याबरोबरच यंदा कोंचिता कार्पिओ मोरालस (फिलिपिन्स), डोम्पेट दुहाफा (इंडोनेशिया), जपान ओव्हरसीज को-ऑपरेशन व्हॉलेंटिअर (जपान), व्हिएंटईन (लाओस) आदींनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विल्सन हे सफाई कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक आहे. हाताने मैला उचलण्याच्या प्रथेला त्यांनी कडाडून विरोध करत त्याविरोधात मोहीम चालवली. भारतीय राज्यघटना व विविध कायद्यानुसार हाताने मैला उचलण्यास कायद्याचा विरोध आहे.
मात्र, भारतात एक लाख 80 हजार दलित मैला उचलण्याचे काम करतात. ही अमानवी प्रथा बंद होण्यासाठी विल्सन हे 32 वर्षे लढा देत आहेत. तर सांस्कृतिक क्षेत्रात अपूर्व योगदान दिल्याबद्दल कर्नाटकी गायक टी. एम. कृष्णा यांना उगवते नेतृत्व या विभागात हा पुरस्कार देण्यात आला.
विल्सन, टी. एम. कृष्णा यांना मॅगसेसे
RELATED ARTICLES