Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीजागतिक महिला दिनी कोयना प्रकल्पग्रस्त महिलांचा मोर्चा

जागतिक महिला दिनी कोयना प्रकल्पग्रस्त महिलांचा मोर्चा

 

तहसीलदार श्री रामहरी भोसले यांना निवेदन देताना आंदोलक महिला.

पाटण:- कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन आज ११ व्या दिवशी सुरूच असुन आज दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोयना प्रकल्पग्रस्त महिलांनी कोयनानगर येथील महसूल भवनावर भव्य मोर्चा काढून पाटणचे तहसीलदार श्री. रामहरी भोसले यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
आज दुपारी कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी मैदानावरील आंदोलन स्थळापासून मोर्चास सुरुवात झाली, “भावासमान बहिणीस हक्क मिळालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा” या घोषणा देत हा मोर्चा एस टी स्टँड मार्गाने महसूल भवनावर धडकला, यावेळी तहसीलदार रामहरी भोसले यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात महिलांना पुरूषाप्रमाणेच हक्क मिळाले पाहिजेत, सबंधित कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासह विविध मागण्यांचा समावेश होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने कोयना प्रकल्पग्रस्त महिला उपस्थित होत्या,
दरम्यान आज महिला दिनानिमित्त आंदोलनाचे व्यासपीठ दिवसभर महिला भगिनींनी चालवले भाषणे गाणी, कविता, ओव्या म्हणून महिलांनी शासनाचा निषेध केला. यावेळी विध्या देशमुख, कविता कदम,सुजाता शेलार, कमल कदम, जयश्री थोरवडे यांचेसह हजारो महिला उपस्थित होत्या, दरम्यान कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आज आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी चैतन्य दळवी, संजय लाड, दत्तात्रय देशमुख, संतोष कदम, दाजी पाटील, श्रीपती माने, संभाजी चाळके यांचेसह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुमारे हजारो महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, मोर्चात उपस्थित महिलांनी यावेळी बांगड्यांचा आहेर देऊन शासनाचा निषेध केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular