वडूज: येरळवाडी (ता. खटाव) येथील रामदास जाधव व उमाजी जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा संकल्प सोशल फौंडेशन माण खटाव ग्रुप च्या वतीने येरळवाडी बस स्टॉप परिसरात वृक्षारोपण केले खरं तर वृक्ष लागवडीची गरज आता सर्वत्र जाणवू लागली आहे त्या मुळे ठिकाणी ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे.
येरळवाडी या ठिकाणी या युवकांनी ही वृक्ष लावली त्याच बरोबर त्याची पूर्ण जबाबदारी मोठी होईपर्यंत त्यांनी स्वीकारली. तस तर रामदास आणि उमाजी दोघांची मैत्री तशी खास परंतु या मैत्रीचा ओलावा कायम एका वृक्षाच्या रुपात टिकून राहावा म्हणून युवा संकल्प सोशल फौंडेशन माण खटाव या ग्रुप च्या वतीने झाडे लावली त्याच बरोबर या युवकांनी स्वतःच्या वाढदिवसा बरोबर या वृक्षाचा ही वाढदिवस करण्याचा निर्धार केला आहे.
या पावसाळ्यात युवा संकल्प सोशल फौंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त झाडे लावू व ती जगवून दाखवू प्रत्येकी एक लावू झाड आणि ही श्रुष्टी करू हिरवी गार..या वेळी युवा संकल्प सोशल फौंडेशनचे अध्यक्ष योगेश जाधव, उपाध्यक्ष प्रवीण बागल, रामदास जाधव, उमाजी जाधव, श्रीराम बागल, नाना जाधव, राहुल देशमुख, नवनाथ जाधव, पंजाब जाधव, अक्षय जाधव, अनिल बागल, प्रमोद देशमुख, किरण बागल, उमेश जगदाळे, शेखर बागल, विशाल शिंदे हे उपस्थित होते.
येरळवाडी येथे वृक्षारोपणाने वाढदिवस साजरा
RELATED ARTICLES

