Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीशिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे आ.आनंदराव पाटील यांना निवेदन

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे आ.आनंदराव पाटील यांना निवेदन

मसूर:राज्य शासनाने 1 नोव्हेंबर पुर्वी नोकरीत नियुक्त असणार्‍या परंतु 100 टक्के अनुदान नसणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रा. फ़ंडाची खाती बंद करुन सुधारित अंशदायी पेन्शन योजनेची खाती सुरु करावी अशा शासनाने काढलेला आदेश रद्द करावा व आम्हाला जुनी पेन्शन योजना मिळावी यासंदर्भाचे मागणी कराड तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आमदार आनंदराव पाटील व आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी आ.बाळासाहेब पाटील व आ. आनंदराव पाटील यांनी सदर निवेदनानुसार उद्यपासून सुरु होणार्‍या अधिवेशनात आवाज उठवून तुम्हाला न्याय देण्याचा 100 टक्के प्रयत्न करु अशी ग्वाही दिली.
निवेदन देताना सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे ,सहसचिव शशिकांत शिंदे , निमंत्रक जगन्नाथ कुंभार कराड तालुका अध्यक्ष सुधाकर चव्हाण, जालिंदर पाटील,राजेंद्र जाधव,मोमीन शाहीन राजेंद्र नांगरे, मोहीते नांदगाव, शरद पाटील काकडे हेळगाव , हेळगाव वडोली,बनवडी नांदगाव,शाहीन व कराड तालुक्यातील शाळांमधील महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पदाधिकारी तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular