महाबळेश्वर :- कोरोना जागतिक महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत अनेक कुटुंबाना रोजच्या महत्त्वाच्या गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ही गरज लक्षात घेऊन तापोळा विभागातील युवासेना कार्यकर्ते यांनी गरजू लोकांची यादी तयार करून गावोगावी जाऊन साहित्याचे वाटप करणे सुरू केले आहे. या साहित्यात तांदूळ, डाळी, कांदे, बटाटे, साखर, तेल, मीठ, चहापवडर, इ. वस्तूंचा समावेश आहे.
महाबळेश्वर तालुका युवासेना तालुकाप्रमुख श्री विशाल सकपाळ, त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री अशोक सकपाळ उद्योजक मुंबई, यांच्या विशेष मदतीतून साहित्य उपलब्ध झाले आहे.. शिवसेना संघटक श्री गणेश उतेकर, तसेच श्री आनंद धनावडे, श्री राम सकपाळ, श्री गणेश सकपाळ, व श्री गणपत कदम व निशांत बुवा सकपाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते साहित्य वितरण करण्यासाठी मेहनत घेत आहे.
या मदत कार्याची सुरुवात आज गोगवे येथील लमाण समाजातील मदतीपासून वंचित 11 कुटुंबे व तळदेव येथील बेलदार समाजातील 6 कुटुंब याना साहित्य देऊन करण्यात आली.
तापोळा विभातातील गावागावातून गरजू लोकांची यादी तयार असून येत्या काही दिवसात गरजू आणि गरीब कुटुंबाना मदत करण्याचे लक्ष युवा सेना कार्यकर्ते यांनी निश्चित केले आहे.
कोठेही राजकारण न करता गरजूंना मदत आणि मा. मुख्यमंत्री महोदयांचे हात बळकट करण्यासाठी युवासेनेचे हा स्तुतस उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाचे कौतुक शिवसेना नेते नामदार श्री एकनाथ जी शिंदे साहेब व माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी केले आहे आणि मार्गदर्शनही करत आहेत.
गरजूंच्या मदतीसाठी सरसावले युवा सेनेचे कार्यकर्ते
RELATED ARTICLES