सातारा : ज्या प्रदेशात वृक्षांची संख्या कमी तेथे पाऊस कमी जेथे वृक्षांची संख्या जास्त त्या प्रदेशात जास्त पाऊस हा निसर्गाचा नियम आहे. पाऊस पडण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन कमीत कमी एक तरी झाड लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे तसेच जास्तीत जास्त झाडे लावू व आपला जिल्हा हरित करु, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
शिवाजीनगर, कुसवडे ता.जि. सातारा येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ आज जिल्ह्यात करण्यात आला. याप्रसंगी उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार आशा होळकर, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक धर्मवीर सालविठ्ठल, वनक्षेत्रपाल शितल राठोड आदी उपस्थित होते.
आपली भावी पिढी सुरक्षीत करण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे मुलाप्रमाणे संवर्धन करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, टंचाईवर मात करायची असेल तर वृक्षारोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही. वृक्ष लागवड कार्यक्रमातून आत्तापर्यंत लावलेल्या वृक्षांपैकी 80 टक्के वृक्ष जगवण्यात आली आहेत. आज या कार्यक्रमाला विविध गावांचे सरपंच आले आहेत त्यांनी खटाव तालुक्यातील निढळ या गावी भेट द्यावी या गावात वृक्षलागवडीचे काम चांगले झाले असून पावसाचे प्रमाणही वाढले आहे.
वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लगावडीसाठी असणार्या योजनांची माहिती तळागापर्यंत पोहचावावी. 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात जिल्हावासियांनी उत्साहाने सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले.
विविध यंत्रणांमार्फत 1 कोटी 39 लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 33 कोटी शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रमा आहे. नागरिकांनी पुढील पिढीच्या भविष्यासाठी एक तरी वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करावे, असे प्रास्ताविकात प्रास्ताविकात उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांनी सांगितले. या कार्यक्रमास विन विभागातील अधिकारी, शिवाजीनगर येथील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्या प्रदेशात वृक्ष जास्त, तिथे पाऊस जास्त जास्तीत जास्त झाडे लावू, जिल्हा हरित करु : जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES

