Saturday, May 17, 2025
Homeठळक घडामोडीजावली तालुकयातील पाच पुलांसाठी सव्वा कोटी मंजूर -: आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

जावली तालुकयातील पाच पुलांसाठी सव्वा कोटी मंजूर -: आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

 दळणवळणाच्या सुविधेला प्राधान्य
सातारा : जिथे रस्ता, तिथे विकास हे ओळखूनच आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावली मतदारसंघात डांबरी रस्त्यांचे जाळे विणले आहे. प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून दळणवळणाच्या सुविधेला नेहमीच प्राधान्य देण्यात आले असून जावली तालुययातील पाच गावातील मागासवर्गीय वस्त्यांना गावाला जोडण्यासाठी ओढ्यावर लहान पुल बांधण्यासाठी पाठपुरावा करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या पाच पुलांच्या कामांसाठी विशेष घटक योजनेंतर्गत सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. यामुळे गोंदेमाळ, रायगाव, मार्ली, म्हाते बु. आणि मोरघर येथील बौध्द वस्तीतील बांधवांचा दळणवळणाचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटणार आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जावली तालुकयातील गोंदेमाळ, रायगाव, मार्ली, म्हाते बु., मोरघर या गावातलगत असलेल्या मागासवर्गीय बांधवांना पुलाअभावी गावात ये- जा करणे अडचणीचे ठरत होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या पाचही गावातील ओढ्यावर लहान पुल बांधण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर पाचही गावातील ओढ्यावर पुल बांधण्यास मंजूरी मिळाली आहे. विशेष घटक योजनेंतर्गत गोंदेमाळ येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये पूल बांधण्यासाठी 24 लाख 20 हजार 416 रुपये, रायगाव येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये पूल बांधण्यासाठी 24 लाख 44 हजार 522 रुपये, मार्ली येथील
मागासवर्गीय वस्तीमध्ये पूल बांधण्यासाठी 19 लाख 99 लाख 237 रुपये, म्हाते बु. येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये पूल बांधण्यासाठी 29 लाख 92 हजार 114 रुपये तर, मोरघर येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये पूल बांधण्यासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मोरघर येथे पूल बांधण्याच्या कामाची निवीदा प्रक्रिया पुर्ण झाली असून उर्वरीत चार कामांचीही लवकरच निवीदा प्रक्रिया मार्गी लागणार आहे. निवीदा प्रक्रीया पुर्ण करुन पुलांची कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जावलीचे सहायक अभियंता मधूकर सूळ यांना केल्या आहेत.  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला हा प्रश्‍न अखेर मार्गी लागला असून ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे अभिनंदन केले आहे. ज्या गावात रस्ता, त्या गावचा विकास झपाट्याने होतो. हे सुत्र ओळखूनच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघात रस्त्यांच्या कामाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. रस्त्यांबरोबरच पुलांचे प्रश्‍न मार्गी लावले जात असून मतदारसंघात होणार्‍या रस्त्यांची अथवा पुलांची कामे दर्जेदार करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular