कराड : येथील दत्त चौक ते मार्केट यार्ड गेट नं.1 ते बैल बाजार हा रस्ता शासनाने राजपत्रीत केलेल्या विकास आराखड्यामध्ये 100 फूट रुंदीचा दर्शविण्यात आला आहे. या बदलामुळे मिळकती बाधीत होणार्या नागरिकांच्या संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर (राज्यमंत्री दर्जा) यांची भेट घेऊन या बाबतचे आपले म्हणणे माडले. यावर सकारात्मक चर्चा होऊन शासन स्तरावर प्रयत्न करून निश्चितपणे 100 फूट रुंद रस्ता करणे बाबतचा निर्णय रद्द करू असे आश्वासन दिले.
सदर रस्त्याबाबत यापुर्वी आराखडा जाहीर झाल्यानंतर मिळकत बाधीत होणार्या नागरीकांनी आपल्या हरकती कराड नगरपरिषदेस सादर केल्या होत्या. नागरीकांच्या हरकतींचा विचार करून कराड नगरपरीषदेनेही याबाबत सकारात्मक धोरण राबवून सदरच्या रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव करून शासनास पाठविला होता.
सदर रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत नगरपरीषदेने अथवा शहरातील नागरीकांनी शासनाकडे कधीही मागणी केलेली नाही. या रस्त्याच्या बाजूला शहरात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी असणारे रस्ते हे पुरेसे रुंद आहेत. या शिवाय सदरच्या रस्त्याचा काही भाग एकेरी वाहतूकीसाठी उपयोगात आहे. सदरच्या रस्त्याची रुंदी ही 50 फूट आहे. या शिवाय मिळकत धारकांचे नुकसान होणार नाही असे अन्य पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. यामुळे अशा परीस्थीतीत उपरोक्त रस्ता 100 फूट असण्याचे कोणतेही कारण नाही.
अशी चर्चा यावेळी शिष्टमंडळाने ना.चरेगांवकर यांचेशी केली. यावर या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधीत होणार्या नागरीकांचे कोणतेही नुकसान होणार नाही असे आश्वासन देऊन सदरचा रुंदीकरणाचा निर्णय मा.नगरविकास मंत्री व मा.मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून सत्वर रद्द करू असे आश्वासन ना.चरेगांवकर यांनी यावेळी दिले.
या चर्चेवेळी कराड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक हणमंत पवार, माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे तसेच संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय शिंदे व जनार्दन जगताप, हेमंत ठक्कर, प्रज्ञेश पटेल, सिराज म्हाते, रोहित भेदा, झुंबरलाल छाजेड, घेवरचंद छाजेड, परेश पटेल, मोतीलाल छाजेड, डाह्याभाई पटेल, सर्जेराव थोरात, विवेक जोगळेकर, शशुद्दीन मुल्ला, प्रविण पटेल, विजय गाडवे, अनिल गाडवे, अॅड.मोहन यादव, अॅड.बाळासाहेब बुधकर, प्रदिप सखदेव, संजय शहा, विजय जगताप, राजाराम जगताप, हर्षद वाघा, थानमल जैन, चेतन शहा, देवीचंद छाजेड, विमलशेठ मुथा, सुरज काबरा, सुरेश जोगळेकर, प्रकाश आवळकर, गजानन गाडवे, शेखर माने, सुभाष इंगवले, दिलीप भोपते, डॉ.सावंत, डॉ.कोळेकर व राजेंद्र गाडवे हे उपस्थित आहे.