म्हसवड : ब्रिटीश राज वटीत सन 1916 मध्ये बांधकाम केलेल्या दहिवडी येथील कनिष्ठस्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीस तब्बल शंभर वर्षे पुर्ण झाली असुनही सुसज्ज व सुरक्षित असलेल्या या न्यायालयाच्या इमारतीचा शताब्दी महोत्सव वर्ष साजरे करण्याचा निर्णय दहिवडी वकील बार संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
भारत देशास सन 1947 मधील 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले.तत्पुर्वी ब्रिटीशांची सत्ता या देशात होती.व तत्कालीन दिवाणी व फौजदारी न्यायालयीन निवाडे करण्यासाठी तालुका तहसिल पातळीवर मोजक्याच ठिकाणी व जनतेच्या सोयीच्या दृष्टीने न्यायालयाच्या इमारतीची बांधकामे केलेली होती.
दहिवडी येथेही दगड व चुनखडीचा वापर करुन सुसज्ज व प्रशस्त इमारत 1916 मध्ये भक्कम उभारण्यात आली.व या इमारतीतच दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे दावे – खटले चालविले जात होते.या इमारतीस यंदा तब्बल शंभर वर्षे पुर्ण होऊनही ही इमारत ऊन, वारा, पाऊस व भुकंपाचे धक्क या नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आजही भक्कम स्थितीत सुरक्षित अशी उभी आहे.
विशेष बाब म्हणजे तत्काली या न्यायालयात कामकाजासाठी सध्याच्या सातारा जिल्ह्यामधील संपुर्ण माण तालुक्यासह खटाव, विटा, फलटण तालुक्यामधील गिरवी परिसरातील गावे व सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुक्यामधीलही नातेपुते परिसरातील गावे या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट केली गेली होती.
गावांची संख्या मोठी असल्यामुळे तत्कालीन या न्यायालयात सातत्याने संबंधित गावातील वादी – प्रतिवादी व वकीलांच्या तोबा गर्दीने न्यायालय व या इमारतीचा परिसर गर्दीने फुलुन जात असे. व या न्यायालयात वकीली व्यवसायातील संबंधित तीन ते चार पिढ्या आजही याच न्यायालयाच्या भक्कम इमारतीत वकीलीचा व्यवयाय करीत आहेत.
ऐतिहासिक वारसा जोपासलेल्या या इमारतीस यंदा शंभर वर्षे यशस्वीरित्या पुर्ण झाल्याने दहिवडी वकील बार असोशिएसने यंदा दहिवडी न्यायालय इमारत शताब्दी महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले असुन या महोत्सव निमित्त दहिवडी वकील बार असोसिएशनची बैठक घेऊन असोसिएशनच्या अध्यक्षपदी जेष्ठ विधी तज्ञ अँड.विजयराव हिरवे,उपाध्यक्षपदी अँड.प्रभाकर कारंडे,सचिवपदी अँड.विठ्ठल दडस व खजिनदारपदी अँड.हिंदुराव काटकर यांची सर्वानुमते नियुक्ती करुन महोत्सव समितीचे गठण केले.
दहिवडी न्यायालय इमारतीचे शतक महोत्सवी वर्ष
RELATED ARTICLES