कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यातील पाच रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली असून, त्यासाठी 12 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
गोवे ते शिवथर रस्त्यासाठी 2 कोटी 75 लाख, किन्हई ते नलवडेवाडी रस्यासाठी 2 कोटी 75 लाख, देऊर ते घिगेवाडी रस्त्यासाठी 3 कोटी 27 लाख, बुध ते आवळीपठार रस्त्यासाठी 1 कोटी व नेर ते नागनाथवाडी रस्त्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अत्यंत महत्वपूर्ण अशा रस्त्यांच्या कामासाठी मी स्वत: पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाल्याने नागरिकांची व वाहनधारकांची चांगली सोय होणार असल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.