Wednesday, March 19, 2025
Homeक्रीडा19 वर्षाच्या इंग्लिश क्रिकेटरचे वेगवान द्विशतक

19 वर्षाच्या इंग्लिश क्रिकेटरचे वेगवान द्विशतक

31 वर्षांनंतर रवी शास्त्रींच्या विक्रमाशी बरोबरी
लंडन: आपल्या पहिल्या शतकासोबतच 19 वर्षाच्या इंग्लिश क्रिकेटर एन्यूरिन डोनाल्डने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. डोनाल्डने 123 चेंडूत द्विशतक ठोकत रवी शास्त्री यांच्या विक्रमाची बरोबरी केली. शास्त्रींनी 1985 मध्ये 123 चेंडूत सर्वात वेगवान द्विशतक ठोकले होते. डोनाल्डने डर्बीशायर विरूद्ध ग्लेमोर्गनकडून खेळताना ही बरोबरी केली. तो स्पेकसेवर्स काउंटी चॅम्पियनशिप डिविजन-2 च्या चार दिवसीय लढतीत खेळत होता.
136 चेंडूत बनविल्या 234 धावा-
* डोनाल्डने मॅचमध्ये 136 चेंडूत 234 धावांची खेळी केली. यात 26 चौकार आणि 15 षटकार होते.
* डोनाल्ड 100, 150 आणि 200 हा धावांचा टप्पा षटकार मारून पूर्ण केला.
* त्याने दुसरे शतक केवळ 43 चेंडूत पूर्ण केले.
* ग्लेमोर्गनच्या संघाने पहिल्या डावात 104.5 षटकात सर्वबाद 518 धावांचा डोंगर उभा केला होता. तर, डर्बीशायरची टीम 52 षटकात 177 धावाच करू शकली. त्यामुळे फॉलोऑन मिळालेल्या डर्बीशायर दबावात होता. फॉलोऑननंतर त्यांचा डाव 3 बाद 78 असा गडगडला.
काय म्हणाला डोनाल्ड?
एन्यूरिन डोनाल्ड म्हणाला, मी खूपच आनंदी आहे. कारण माझ्या खेळीमुळे आमचा संघ मजबूत स्थितीत पोहचला. मी मागील काही दिवस लयीत येण्याचा प्रयत्न करीत होतो.
मला विक्रमाबाबत काहीही माहिती नाही पण जर मी रवी शास्त्रींच्या विक्रमाची बरोबरी केली असेल तर ही बाब फार समाधानकारक वाटते.
* बडोद्यात शास्त्रींनी केला होता विक्रम
* डोनाल्डने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आतापर्यंत 15 सामने खेळले आहेत. यात त्याने 869 धावा केल्या आहेत.
* 19 वर्ष 211 दिवसाचा असलेला डोनाल्डने ग्लेमोर्गनसाठी हँम्पशायरविरूद्ध 2014 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता.
* रवी शास्त्रींनी 1985 मध्ये मुंबईकडून खेळताना बडोद्याविरोधात सर्वात वेगवान म्हणजेच 123 चेंडूत द्विशतक ठोकत विक्रम केला होता.
* या विक्रमासोबत डोनाल्ड ग्लेमोर्गनच्या इतिहासात द्विशतक ठोकणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला.
* 96 धावात तीन विकेट गमविल्यानंचर मैदानात आलेल्या डोनाल्डने 15 वा षटकार एवढया जोरात मारला की मैदानाबाहेरून जाणार्‍या एका कारचे नुकसान झाले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular