सातारा : आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी सातारा जिल्ह्याची माणदेश एक्सप्रेस अर्थात मोही, ता. माण येथील क्रीडापट्टू ललिता बाबर हिच्या संघर्षमय क्रीडा प्रवासावर डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली असून या डॉक्युमेंटरीचे प्रसारण दि. 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 11 वाजता साम टिव्हीवर करण्यात येणार आहे.
इन्चेऑन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्टिपलचेस क्रीडा प्रकारात जागतिक उच्चांक नोंदवणार्या ललिता बाबरने राष्ट्रीय पातळीवर अनेक मॅरेथॉनमधून आपले अॅथलेटिक्समधील क्रीडा नैपुण्य सिध्द केले आहे. ललिता बाबरचा बेंगलोर येथे 20 ऑगस्टपासून सुरु होणार्या रियो ऑलिपिकसाठी कसून सराव सुरु आहे. या सरावाच्या निमित्ताने ललिताने गेल्या वर्षभरात सुमारे 14 मॅरेथॉनमधून भाग घेतला. या माणदेश कन्येचा संघर्षमय क्रीडा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. या प्रेरणेला आता छोट्या पडद्यावर झळकवण्याची तयारी पूर्ण झाली असून माणदेश एक्सप्रेस ललिता बाबर या लघुचित्रपटातून ललिताचा जिवंत प्रवास झळकणार आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन प्रसाद माने यांनी केले आहे.