सातारा : येथील इंडियन ऑईलचे अधिकृत वितरक रेणुका पेट्रोल पंपाचे वर्धापनदिनानिमित्त आज सातारा शहरात प्रथमच फ्लॅश मॉब डान्सचा नृत्य प्रकार सादर करण्यात आला.
रेणुका पेट्रोल पंपाचा 40 वा वर्धापनदिन व इंडियन ऑईल कंपनीचा 57 वा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम रेणुका पेट्रोल पंपावर संपूर्ण दिवसभर साजरे केले गेले यात आज सकाळी 12 वाजता शहरातील नेक्स्ट जनरेशन डान्स अॅकॅडमीच्या वतीने हा प्रकार सादर करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी या डान्स अॅकेडमीचे वतीने हा फ्युजन प्रकार सादर करण्यातन आला. यानृत्यामध्ये निलेश चव्हाण, नितीश चव्हाण, विरेंद्र मल्लकमीर ,श्रीकेश मगर, रजत शिंदे व बाल कलाकारांनी सहभाग घेतला.
परफॉर्मन्स सादर करत शहरागतील ग्राहक आणि नागरीकांचे लक्ष वेधून घेण्यासागठी असा हा फ्लॅश मॉब डान्स परदेशात विविध ठिकाणी सादर केले जातात. सातारा शहरातही असा प्रकार प्रथम घ्यावा अशी मनस्वी इच्छा असल्याने आज या उपक्रमाचे आयोजक केले असल्याची माहिती रेणुका पेट्रोल पंपाचे मालक रितेश रावखंडे यांनी दिली.
या वर्धापनदिन सोहळयाच्या नृत्य प्रकाराचा आनंद लुटण्यासाठी सातारकरांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.
रेणूका पेट्रोल पंपावर पहिल्यांदाच फ्लॅश मॉब डान्स सादर
RELATED ARTICLES