Friday, June 20, 2025
HomeUncategorizedतालुका स्तरांवर क्रीडा स्पर्धेत जिल्हापरिषद शाळा मायणी मुले प्राथमिक शाळेचे यश

तालुका स्तरांवर क्रीडा स्पर्धेत जिल्हापरिषद शाळा मायणी मुले प्राथमिक शाळेचे यश

मायणी:ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)खटावयेथे घेण्यात आलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धामध्ये खटाव तालुका अंतर्गत क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या,यामध्ये जिल्हा परिषद शाळा मायणी मुले यांनी रस्सीखेच संघाने भाग घेतला होता या मध्ये मायणी शाळेचे सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला या मध्ये कर्णधार यश भिसे,प्रथमेश चव्हाण, आर्यन भिसे,सुरज मंडले, यश भोंगळे, हर्षद पाटोळे, कुणाल जाधव,यशराज माळी,संग्रम भोंगाळे,आदित्य कुंभार, सुहास पाटोळे, या खेळाडूनीं चमकदार कामगिरी केली. विजेत्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. रामचंद्र सुर्यभान जगताप यांचे मार्गदर्शन लाभले
विजेता खेळाडुंचे माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मीण पिसे,विस्तार अधिकारी सुजाता जाधव,केंद्र प्रमुख प्रमोद जगदाळे, मुख्याध्यापक उमा प्रमोद वडगावकर,व सर्व शिक्षकांनी आभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular