Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमेढ्यात राजरोसपणे सुरू असणार्‍या अवैध उत्खननास जबाबदार कोण ?

मेढ्यात राजरोसपणे सुरू असणार्‍या अवैध उत्खननास जबाबदार कोण ?

मेढा ः मेढा येथील परिसरात खाजगी कामांसाठी राजरोसपणे अवैध उत्खनन प्रक्रिया घडत असून सदर उत्खननास पाठीशी घातले जात असल्याने याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.
संपूर्ण तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या या मेढा नगरीत विपरीत घटना घडत असून या नगरीत आणी परिसरात अवैधरित्या उत्खनन उपसा होत असून यांना कोणाची मदत मिळत आहे याची खरमरीत चर्चा बाजारपेठेत होत आहे. कोणत्याही ठिकाणी कोठेही मिळल त्या वाहनाने विविध कारणाकरीता उत्खनन प्रक्रिया राबवली जात असून संपूर्ण मेढा आमच्या बापाचा या अविर्भावात कोणत्याही परवानगी शिवाय , अधिकारी वर्गास न विचारता मनमानी कारभाराने अनाधिकृत माती उत्खनन होत असून प्रशासनही फक्त आ वासून बघत बसला आहे. मेढा येथील रस्त्यांशेजारी, डोंगरकपारीत विविध उत्खनन प्रक्रिया राबवल्या गेल्या असून सदर ठिकाणी परवानगी न घेता उत्खनन करणारे बिल्डर, जागा मालक यांना कोणत्याही प्रकारचा दंड न करता फकत बघ्याची भुमिका घेणारे प्रशासन अधिकारी यांचे हात ओले केले आहेत काय अशी चर्चा होऊ लागली आहे.
मेढ्यात उत्खनन, अनधिकृत उद्योग , व्यवसाय प्रश्नी प्रशासनच कानाडोळा करत असल्याने कुंपणच शेत खात असल्याने राखण कोणाकडे मागायची हा प्रश्न निर्माण होत आहे .प्रशासकीय अधिकारी वर्गाने जर कामात कर्तव्यनिष्ठा दाखवली तर अवैध उत्खनन करणारे यांना दंड स्वरूपात शिक्षा होवून त्यांना चांगलाच चाप बसू शकतो आणी नागरीकांचाही प्रशासकीय अधिकारी वर्गावर विश्वास राहील असे बोलले जात असून या अवैध उत्खनन करणारे बिल्डर, जागा मालक यांचे वर कडक कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे
एकीकडे अवैध उत्खनन करणारे यांचकडून शासन कोटयावधी रुपये दंड ठोठावते परंतु जावली तालुक्यातच याची कारवाई का होत नाही, यात काही गौडबंगाल किवा तोडपाणी केली जात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular