भुईंजः राज्यातील विविध सहकारी संस्थांना एनसीडीसीच्या माध्यमातुन भेट देत आहोत. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास भेट दिल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी सहकार समृध्दीसाठी बारकाईने अभ्यास करित नवनवीन शेतकरी हिताचे प्रकल्प उभारले आहेत, ते पाहुन आम्ही प्रभावित झालो आहे. सहकारी संस्थाचे मजबुतीकरण करणे हा आमचा मुख्य हेतू असून किसन वीर राबवित असलेल्या प्रकल्पांबरोबच भविष्यातील किसन वीरच्या उज्वल प्रगतीसाठी एनसीडीसी आपल्यासोबत असल्याचे प्रतिपादन, राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे कार्यकारी संचालक संदिपकुमार नायक यांनी केले.
किसन वीर सातारा सहकारी कारखान्याच्या विविध प्रकल्पांची माहीती घेण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे कार्यकारी संचालक संदिपकुमार नायक, विभागीय संचालक वंदना सौदी यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संदिपकुमार नायक पुढे म्हणाले, सहकारी संस्थाचे काम आदर्शवत व्हावे आणि त्यातुन शेतकर्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी एनसीडीसी मोठ्या प्रमाणात काम करित आहे. शेतकर्यांच्या मालनिर्मितीपासुन त्या मालाच्या निर्यातीबाबत ते सहकारी संस्थाना सर्वतोपरी मदत करीत असतात. किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या सुयोग्य नियोजनाखाली कारखाना व्यवस्थापनानेे शेतकरी हिताचे पर्यायाने शेतकरी हित हा सहकाराचा शुध्द हेतू जपत आदर्शवत काम केले आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी कारखाना राबवित असलेल्या प्रकल्पांची माहीती पाहुण्यांना सविस्तरपणे करून दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मदनदादा भोसले आणि उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी केले.
यावेळी कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, प्रतापगड कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. वाय. महिंद, अर्जुन भोसले, सुनील शिवथरे, रमेश पाटील, किशोर बाबर, शामराव बाबर, मोहन भोसले, अरूण भोसले, विक्रम निकम, शेखर निकम, सुभाष बाबर, दिपक निकम, सागर भिंताडे, विनोद जाधव यांच्यासह कारखान्याचे शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.