Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीमधूमिताच्या कलाकारांनी केले जलसंधारण कामात श्रमदान

मधूमिताच्या कलाकारांनी केले जलसंधारण कामात श्रमदान

म्हसवड ःनाट्य महोत्सवाच्या निमित्ताने गावाशी कौटुंबिक नाते जुळलेल्या मधूमिताच्या कलाकारांनी जलसंधारणाच्या कामात श्रमदान करून गोंदवलेकर हाच माझा नाथ असल्याचे दाखवून दिले.
गेल्या अनेक वर्षापासून नाट्य महोत्सवाची परंपरा असलेल्या गोंदवले खुर्द(ता.माण)येथील लोकांनी जलसंधारणासाठी जिद्दीने पाऊल उचलले आहे.या कामात श्रमदानाच्या माध्यमातून अनेक संस्था,संघटना व नागरिक सहकार्य करत आहेत सातारा येथील मधूमिता कला अकादमीच्या कलाकारांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच झालेल्या नाट्य स्पर्धेत मनाथ हा माझाफया नाट्यप्रयोगाचे सादरीकरण केले होते. या प्रयोगाला गोंदवलेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.शिवाय या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविल्याने या कलाकारांशी अधिक जवळीक होऊन ग्रामस्थांचे कौटुंबिक नाते जुळले.या नात्यातूनच मधूमिता अकादमीचे संस्थापक व रंगकर्मी अभिजित वाईकर यांनी जलसंधारण कामात श्रमदान करून गोंदवलेकरांना प्रोत्साहन देण्याचे ठरविले.त्यानुसार सर्व कलाकार घेऊन त्यांनी थेट फाळकेवस्ती जवळ सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामावर हजर झाले.सकाळी सात वाजल्यापासून सलग तीन तास या कलाकारांनी श्रमदान केले.आत्तापर्यंत रंगमंचावर अभिनय करणारे चेहरे आज पाण्यासाठी श्रमदानात घामाने भिजून निघाले होते.तरीही त्याच उत्साहात केलेच्या कदरदानांच्या भवितव्यासाठी राबत होते.या श्रमदानामुळे गोंदवलेकरांशी असलेले नाते अधिकच घट्ट झाल्याची भावना यावेळी अभिजित वाईकर यांनी व्यक्त केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular