म्हसवडः नुकतेच शैक्षणिक वर्ष 2019-20 ला सुरवात झाली.विदयार्थ्यांना शाळेची आवड व गोडी लागावी म्हणून म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात नवीन प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य क खाऊ देऊन नवागतांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात नवीन प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर,सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.यावेळी क्रांतिवीर शैक्षणिक संकुला बद्दल माहिती सांगण्यात आली.या उपक्रमामध्ये संकुलातील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा,प पु आत्मगिरी माध्यमिक विद्यालय,क्रांतिवीर ज्यु कॉलेज,क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कुल,नूतन प्राथमिक शाळा,सिद्धनाथ बालक मंदिर या विविध शाळांमध्ये नवीन विदयार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन स्वागत केले.
यावेळी प्राचार्य विठ्ठल लवटे, मुख्याध्यापक अनिल माने तसेच शिक्षक,शिक्षिका,पालक,विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन नवागतांचे स्वागत
RELATED ARTICLES