Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीअंबवडे परिसरात वृक्षारोपण करुन वूमन्स पॉवर फौडेंशनचा शुभारंभ

अंबवडे परिसरात वृक्षारोपण करुन वूमन्स पॉवर फौडेंशनचा शुभारंभ

सातारा : महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने सातारा तालुक्यातील अंबवडे परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम वूमन्स पॉवर फौंडेशन या संस्थेच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. यावेळी वूमन्स पॉवर फौंडेशनच्या सदस्यांनी नारी शक्तीची घोषणा देऊन सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिनाचा शुभारंभ केला. यावेळी डोंगर कपारीत व अंबवडे गावानजीक वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात वूमन्स पॉवर फौंडेशनच्या महिलांनी सहभाग घेतला होता. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या संस्थेच्या महिलांनी केला.
महिलांमध्ये असणारे सुप्त गुण ओळखून त्यांच्या साठी आगळे वेगळे सामाजिक उपक्रम घेऊन महिलांचा सर्वांगिण विकास करण्याचा उद्देश ठेऊन वूमन्स पॉवर फौंडेशन या संस्थेची स्थापना 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सातारकरांसाठी आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची आमची संकल्पना आहे. या कार्याचा शुभारंभ अंबवडे परीसरात वृक्षारोपण करून आम्ही सर्व महिलांनी केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महिलेला आम्ही या कार्यात सहभागी करून घेणार असल्याचे संस्थापक अध्यक्षा सौ.वर्षा राजेश भोसले यांनी सांगितले. यावेळी अंजली शिंदे, स्मिता देशमुख, पल्लवी शिंदे, श्रद्धा पवार, मेघमाला कदम, चित्रा भिसे, वृषाली गायकवाड, पूजा कवठेकर आदी महिला उपस्थित होत्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular