हवाई दलाकडुन कराडकरांना विमान भेट

कराड : कराड गेली 20 वर्षे येथे विजय दिवस समारोह साजरा करणार्‍या विजय दिवस समारोह साजरा करणार्‍या विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक कर्नल संभाजी पाटील यांच्या पाठपुरव्याने हवाई दलाकडुन कराड नगरपरिषदेस विमान भेट देण्यात आले आहे. हे विमान आदरणीय पी. डी. पाटील उद्यानात ठेवण्यात येणार असुन कराडकरांसह पर्यटकांचे ते आकर्षण ठरणार आहे. हे विमान येथे दाखल झाले असून ते उद्यानात बसवण्याची तयारी नगरपालिकेने सुरू केली आहे.
देशाचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण मंत्री असताना भारतीय लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेत आपला ठसा उमटवला. होता. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे तळबडीचे परंपरा आहे. त्यामुळे या भागातील तरूणांना लष्करात भरतीय होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी बांगलादेश मुक्ती विजय दिवस समारोह साजरा करण्यात येतो.
आणखी दोन रणगाडे येणार
कराडची लष्करी परंपरा लक्षात घेऊन तरूणांना लष्करांत भरती होण्याची प्रेरणा मिळावी या हेतुने लष्करात भरती होण्याची प्रेरणा मिळावी या हेतुन लष्कराकडुन एक विमान कराडला भेट देण्यात आले आहे. हे विमान काल सायंकाळी येथे मोठया वाहनातुन आणण्यात आले. शुक्रवारी ते आदरणीय पी. डी. पाटील उद्यानात ठेवण्यात आले. याबरोबरच आणखी दोन रणगाडे येणार असुन ते यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन मध्ये ठेवण्यात येणार आहेत.
यासाठी नगरपालिकेने नुकताच़़ ठरावही केला आहे. विमानाची बॉडी व अन्य सुट्टे भाग उद्यानात ठेवले आहेत. येथे चबुतरा बांधल्यानंतर हे विमान जोडण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड पालिका चांगली कामगिरी करत आहे. यात सुशोभीकरणासही महत्त्व असुन लष्कराचे रणगाडे व विमानाच्या प्रतिकृतिने पर्यटकांना चा ओघ वाढणार आहे. एकंदरीत हे विमान काराडकरांसह पर्यंटकाचे ते आकर्षण ठरणार आहे.