Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीप्रशिक्षणार्थीची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट

प्रशिक्षणार्थीची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट

सातारा: वैकुंठ मेहेता राष्ट्रीय सहकारी प्रबंध व प्रशिक्षण संस्था, पुणे (वमनीकॉम) ही राष्ट्रीय पातळीवरील सहकारी चळवळीसाठी व प्रशिक्षणासाठी अग्रणीय व नामांकित अशी संस्था आहे. अशा या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून नेपाळ, सिक्कीम, अलहाबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, व मुंबई अशा विविध देश व राज्यातील प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थीनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाची पद्धत समजून घेणेसाठी भेट दिली.
देश परदेशातील कृषी, बँकिंग, सहकार क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी यांनी सातारा जिल्हा बँकेचे कामकाजाची कार्य पद्धती समजून घेणेसाठी यापूर्वीही भेटी दिल्या आहेत. जिल्ह्यातील प्रकल्प, शेतकरी मंडळ, महिला बचत गट तसेच इतर यशस्वी केंद्राची पाहणी करून जिल्हा बँकेच्या कामाचे कौतुक केले जाते. प्रामुख्याने जिल्हा बँकेची 0% छझA ची परंपरा, शेतकरी मंडळासाठीचे उल्लेखनीय कार्य, विकास संस्था सक्षमीकरण, विकास संस्थाना बिझनेस डेव्हलपमेंट प्लान अंतर्गत इतर व्यवसायास अर्थसहाय्य व मार्गदर्शन, पडीक जमीन विकास कार्यक्रम, महिला बचत गटाची मोठी चळवळ, संगणकीय कार्यप्रणाली अशा विविध सातत्यपूर्ण ग्रामीण विकासाची राज्य व देशपातळीवर नोंद घेऊन नाबार्ड, राज्य बँक, तसेच इतर सहकारी संस्था मार्फत सातारा जिल्हा बँकेस अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेने सेवेचे जाळे ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविले असून अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बँकेने आर.बी.आय./ नाबार्ड यांचे नियम व निकष तंतोतंत पाळले आहेत. बँक स्थापनेपासून ऑडीट वर्ग अ,0% एन पी ए ची परंपरा, विकास संस्था सक्षमीकरण, विकास संस्थाना बिझनेस डेव्हलपमेंट प्लान अंतर्गत इतर व्यवसायास अर्थसहाय्य व मार्गदर्शन, बँक राबवीत असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, सामाजिक बांधिलकी इत्यादी कामकाज उत्कृष्ट असलेमुळेच बँक देशामध्ये सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी असून बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.
राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे अत्याधुनिक सेवा सुविधा देणेसाठी कोअर बँकिंगचा अवलंब केलेला आहे. जिल्हा पत पुरवठा आराखडा मध्ये जिल्हा बँकेचा पिक कर्जाचा वाटा 50 % पेक्षा अधिक असून ग्रामीण भागात शेती व शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, यामध्ये राष्ट्रीयकृत व इतर खाजगी बँकेपेक्षा सातारा जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेस खर्‍या अर्थाने चालना मिळाली आहे.
बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे यांनी बँकेच्या गेल्या सात दशकाची यशस्वी वाटचाल विषद केली. यामध्ये विशेष करून बँकेची वसुली यंत्रणा , ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, शून्य टक्के निव्वळ एन.पी.ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुक सेवा यामुळे बँकेस आय.एस.ओ. 9001-2008 मिळालेले नामांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली नोंद, सामाजिक बांधिलकी यामुळे देशाचा नावलौकिक देशपातळीवर झालेला असलेचे सांगितले.
वमनीकॉम प्रशिक्षण संस्थेकडून भेटीस आलेल्या प्रशिक्षनार्थिनी बँकेची सखोल माहिती घेऊन आपल्या शंका निरसन करून घेऊन बँकेच्या कार्याचा आदरपूर्वक गौरव केला.
प्रारंभी वमनीकॉम प्रशिक्षण संस्थेच्या प्रोफेसर मनीषा पालीवाल यांनी, संस्थेने प्रशिक्षानार्थींची भेटीसाठी सातारा जिल्हा बँकेची निवड का केली याची माहिती दिली. प्रशिक्षानार्थींनी आपापला परिचय करून देऊन बँकेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बँकेने विकासाभिमुख उपक्रम राबविलेले आहेत.
सहकार क्षेत्रासाठी हि बाब अत्यंत आदर्श आहे.ग्रामीण भागातील सभासदांच्या कल्याणासाठी व देशाच्या कृषी उत्पादनात भरघोस वाढीसाठी सहकाराच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज केलेले असलेचे पहावयास मिळाले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध नाविन्यपूर्ण योजना व बँकेची उत्कृष्ठ कार्यप्रणाली असल्याने अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेची नेहमीच निवड करीत असते असे आवर्जून सांगितले.
या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक श्री. शामराव गायकवाड,श्री. नाना लंगुटे, तसेच विभागातील उपव्यवस्थापक, अन्य अधिकारी व सेवक उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular