Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तुटक्या फरशीला उरला नाही वाली

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तुटक्या फरशीला उरला नाही वाली

सातारा: सातारा जिल्ह्याचा कारभार पाहणार्‍या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरील फरशी अनेक दिवसांपासून फुटली आहे. त्यामुळे या ठिकाणी भेट देणार्‍या अभ्यगतांना बांधकाम विभागाची लक्तरे पाहण्यास मिळत आहेत. या तुटक्या फरशीला वाली उरला नाही. असे सध्या तरी दिसून येत आहे.
ब्रिटीश काळातील दगडी इमारतीमध्ये पूर्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय होते. या ठिकाणी अनेक मात्तबर जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून आपले नाव कायम स्वरूपी कोरलेले आहे. अलिकडच्या काळात उदाहरण द्यायचे झाले तर जिल्हाधिकारी म्हणून अरूण भाटिया, अनिल डिग्गीकर, ओमप्रकाश गुप्ता, सुबराव पाटील, भगवान सहाय्य, एस.के.सिंग, वंदना खुल्लर, डॉ.एम.रामास्वामी, आश्‍विन मुदगल यांचे नाव सातारकरांच्या लक्षात राहिलेले आहे. सध्याच्या सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल या सुध्दा तडकाफडकी निर्णय घेवून विकासकामांना चालना देत आहेत.पूरग्रस्त, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीवरही त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून जनतेला दिलासा दिला आहे. परंतु नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना रस्त्यावरील तुटलेल्या फरशीचे अनेकांनी दर्शन घेतलेले आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातीन पत्रव्यवहारासाठी प्रवेशद्वारानजिक एक कक्ष आहे. या कक्षामधून आवक जावक पत्रव्यवहार नोंद केली जाते. या ठिकाणी अनेक गोपीनीय कागदपत्र असतात. परंतु एक वर्षापूर्वी या कक्षाच्या दरवाज्याचे कुलूप निघत नसल्याने अखेर या दरवाजाचा कडीकोयंड्यासह चौकानी भाग दरवाजापासून अलिप्त केला. आजही या दरवाजाला बाहेरून कडीकोयंडा नाही. त्यामुळे अनेकांना शनिशिंगणापूर गावची आठवण होते. या गावातही दरवाजाला कडीकोयंडा नसतो. तसा प्रकार येथे दिसून येत आहे.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमीपुजन 2015 साली झाले होते. त्यानंतर ही इमारत पूर्ण होवून दि 18 मे 2017 रोजी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन झाले. पण दोनच वर्षात या कार्यालयातील रस्त्यावरची फरशी उखडून पडलेली आहे. जिल्हयातील अनेक निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी म्हणून काही जण दर आठवड्याला एक निवेदन देवून त्याची बातमी छापून आणतात. पण आत्तापर्यंत परिपूर्ण कशाचीही चौकशी झालेली नाही. आता या तुटलेल्या फरशीची चौकशीचीच मागणी उरली आहे. ती या निमित्त उरकून टाकावी, अशी आता सामाजिक कार्यकर्ते मागणी करू लागले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular