Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीतहसिलची वाळू चोरांवर करडी नजर; पथके कार्यरत

तहसिलची वाळू चोरांवर करडी नजर; पथके कार्यरत

कराड: कितीही नियंत्रण ठेवले तरी कराड तालुक्यात नदीकाठच्या गावात वाळू चोरीचे प्रकार वाढल्याने या वाळू चोरांना चाप लावण्यासाठी महसूल विभाग सतर्क झाला आहे. मंडल अधिकारी, तलाठी, कर्मचारी यांचा समावेश असणारी पथके तयार करण्यात आली असून त्यांच्यामार्फत नदीकाठी रात्रगस्त घातली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कराड तालुक्यात बेकायदा वाळू उपशाने डोके वर काढले आहे. वाळूची मागणी वाढल्याने आणि झटपट बक्कळ पैसा मिळत असल्याने बाळूमाफीयांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नदीकाठच्या गावात त्यांनी आपले लक्ष वळविले आहे. अतिवृष्टी व महापुरामध्ये नदीचे पात्र विस्तारले होते. पंधरा दिवस पूर परिस्थिती कायम राहिल्याने नदीपात्रात मोठया प्रामणात वाळू जमा झाली आहे. या वाळूवर वाळूचोरांची नजर पडली आहे. रात्रीच्या वेळी जसेबी, ट्रक, ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची चोरी केली जात आहे. यासाठी स्थानिक युवकांनाही आर्थिक लालूच दाखवून बेकायदा वाळू उपशात सहभागी करुन घेतले जात आहे.
काही दिवसांपूर्वी बेकायदा वाळू व दगड उत्खनन प्रकरणी महसूल विभागाने धडक कारवाई करुन एक जेसीबी, एक ट्रक व दोन ट्रॅक्टर जप्त केले होते. या प्रकरणी दोघाजंणाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तर सोमवारी पाहटे पाचच्या सुमारास प्रीतीसंगम घाटावर बेकायदा वाळू उत्खनन करताना तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडल अधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम यांनी एक जेसीबी, ट्रक व ट्रॅक्टर जप्त केला आहे. यातही दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू चोरीचे प्रकार रोखण्यासाठी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील पथके तयार करण्यात आली असून यामध्ये मंडल अधिकारी व तलाठी यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांमार्फत नदीकाठच्या गावात रात्रगस्त घालण्यात येत आहे. ही पथके पुढील काही दिवस कार्यरत राहणार आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular