परळी :- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मार्फत बुधवार दिनांक 6 मे रोजी परळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स सह सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना वायरस पासून संरक्षण व्हावे म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले, सदर शिल्ड मिळवून देण्याकरिता राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश सचिव श्रीरंग देटे यांनी विशेष प्रयत्न केले.
या वाटप वेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे परळी विभागाचे प्रमुख डॉ. मुराद मुलाणी, परळी ग्रामपंचायतीच्या सरपंच लताताई गंगावणे, आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. सचिन यादव, डॉ. उर्मिला बनगर व आरोग्य केंद्र कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री श्रीरंग देटे यांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स सह सर्व कर्मचाऱ्यांना देवमाणूस म्हणून संबोधले व आपण कोरोनाच्या महामारित आपल्या जीवाची पर्वा न करता व कुटुंबीयांची काळजी न करता जनतेची सेवा करीत आहात म्हणून मनपूर्वक आभार मानले, तसेच सातारजिल्ह्याचे राष्ट्रवादी डॉक्टर विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसन्ना बाबर, व आमदार आणि ट्रस्ट प्रमुख हेमंत टकले, महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय बोरगे यांचे आभार मानले
आरोग्य कर्मचाऱ्यांना फेसशीलडचे वाटप
RELATED ARTICLES