महाबळेश्वर : आज सकाळी महाबळेश्वरकरांची सुरवात एका खळबळ जनक बातमीनं झाली. लॉकडाऊन असल्याने फारसं घराबाहेर पडणं होत नसल्याने सर्व निवांतच . पण जेव्हा महाबळेश्वर मध्ये कोरोना बाधित रूग्ण सापडला ही खबर कानावर आली अन काळजात धस्स झालं. या एका बातमीनं संपूर्ण महाबळेश्वर हादरलं . बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली.पण कोरोना बाधित रुग्णाला साताऱ्यातच पकडुन रुग्णालयात भरती केले आहे आणि थेट महाबळेश्वरमध्ये त्याचा संबंध आला नसल्याचे समजताच सर्वांचा जीव सद्यातरी भांड्यात पडला आहे.
महाबळेश्वर मध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासन जीव ओतून काम करतंय. येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवली जातेय . येथील तीनही प्रवेशद्वारावर रात्रंदिवस महाबळेश्वर कडे येणारे जाणारे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात सर्व जग सामना करत असलं तरी देखील गेल्या दीड महिन्यापासून या कोरोनाला महाबळेश्वर मध्ये थारा मिळाला नव्हता . यामुळे कोरोना पासून चार हात लांब राहिलेला तालुका आता मात्र या कोरोनाने महाबळेश्वर शिरकाव केलाय या एका बातमीने महाबळेश्वरकरांना स्तब्ध केलयं.
ह्या कोरोना बाधिताच्या पत्ता हा जरी महाबळेश्वर चा असला तरीदेखील याचा संबंध महाबळेश्वर मध्ये आलेला नाही.सातारा आणि महाबळेश्वर येथे हा सदर व्यक्ती राहत होता . त्यामुळे त्याचा संपर्क कोनाकोणाशी आला होता याची माहिती घेतली जात आहे.मिळलेल्या माहितीवरून हा व्यक्ती कामानिमित बाहेरील राज्यात होता . तेथून मुंबई येथे आला येथेच त्याला कोरोनाची लागण झाली. मुंबई येथून तो आपल्या गावी जाण्यासाठी निघाला शिरवळ येथुून एका दुचाकी स्वाराच्या मदतीनं सातारा येथे पोहचला. स्थानिक नागरिकाच्या ही बाब लक्षात आली अन त्याची माहिती ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. आणि येथेच त्या कोरोना बाधितला आपल्या ताब्यात घेऊन त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
खबर दारीचा उपाय म्हणून सदर कोरोना बाधित इसमाच्या कुटुंबियांना महाबळेश्वर येथील एम .टी .डी .सी. रिसॉर्ट मध्ये स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर अलगिकरन कक्षात ठेवण्यात आलेले आहे अशी माहिती महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
सद्य स्थितीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संपर्कात आला नसल्याने महाबळेश्वरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.त्यामुळे सध्यातरी महाबळेश्वर कोरोना मुक्त आहे असंच म्हणावं लागेल.
महाबळेश्वर कोरोना मुक्तच ; “त्या” रुग्णाचा महाबळेश्वरशी थेट संबंध नाही ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
RELATED ARTICLES