परळी :- पावसाळा सुरू झाला की ग्रामीण भागातील समस्या तोंड वर करतात रस्ता खचणे दरडी पडणे अपघात होणे यांचे जणू सत्र सुरू होते. परळी खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे त्यामुळे डोंगरावरील दरड ही रस्त्यावरून येऊन वाहतूक ठप्प होत आहे.
कातवडी येथील डोंगरावरील मोठमोठाले दगड रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता गेल्या दोन दिवसांपासून दगड रस्त्यावरच असल्याने वाहनधारकांची दमछाक उडत होती परंतु वाहतुकीस अडचण येत असल्याचे कातवडी येथील काही युवकांच्या लक्षात येताच गणेश धनावडे, यशवंत घाग, शैलेश लोटेकर, संदीप लोटेकर,जितेंद्र लोटेकर यांनी पुढाकार घेत सर्वांनी मिळवून रस्त्यावरील मोठमोठे दगड हटवून रस्ता वाहतुकीस सुरू केला. युवकांनी या केलेल्या कामाची ग्रामस्थांकडून तसेच प्रवाशांकडून कौतुक होत आहे
लोटेकर कातवडी येथील युवकांनी हटवल्या रस्त्यातील दरडी
RELATED ARTICLES