Friday, June 20, 2025
HomeUncategorizedशॉर्टसर्किट होऊन तीन शेळ्या मृत्युमुखी

शॉर्टसर्किट होऊन तीन शेळ्या मृत्युमुखी

 

वार्ताहर
परळी

परळी येथील कुस बुद्रुक येथे आज दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल मारुती लोटेकर यांच्या घरातील तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे की सोमवारी दुपारी परळी खोऱ्यात वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यातच कूस बुद्रुक येथील विठ्ठल मारुती लोटेकर यांच्या घरावरील विद्युत तारा तुटल्याने व ही तार गुरांचा गोठावर पडल्याने गोठ्यातील तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून काही जनावरे जखमी झाली आहेत. ही घटना दुपारी 2.15 सुमारास घडली असून घटना समजतात तत्काळ ग्रामस्थांनी विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितला. तसेच सदर घटनेची कल्पना वनखाते तलाठी वनाधिकारी यांना देताच त्यांनीदेखील पाहणी केली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular