Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedपरळीत कोरोनाचा शिरकाव

परळीत कोरोनाचा शिरकाव

 

 

वार्ताहर
परळी
जिल्ह्यातील रुग्ण संख्या जवळपास दहा हजारां समीप आली असून दिवसेंदिवस वाढणारे आकडे काळजाचा ठोका चुकवत आहेत. परळी खोऱ्यातही कोरोना पुन्हा डोकावत आहे. शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्ट मध्ये परळी येथील 64 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळल्याने भागात थरकाप उडाला आहे.
सदर महिलेस 17 ऑगस्ट पासून ताप व जुलाब असा त्रास होत असल्याने सातारा येथील मंगळवार पेठेतील खाजगी दवाखान्यात त्यांनी उपचार घेतला त्यांना काही फरक पडला नाही. तसेच डॉक्टरांच्या तपासणीमध्ये पल्स रेट कमी आल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. तदनंतर त्यांचा रिपोर्ट पुढे पाठवण्यात आला. शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सदर महिलाही पॉझिटिव्ह आल्याने भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. परळी खोऱ्यातून हद्दपार झालेला कोरोना पुन्हा हातपाय पसरणार नाही ना या भीतीने परळी खोरे चिंताग्रस्त झाले आहेत तसेच सदर महिलेचे 10 जण हायरिस्क असून दोन जण लो रिस्क आहेत. तसेच दहा जणांचे घेतले स्वाबअसून ते सध्या होम आयसोलेशन मध्ये आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular