Friday, June 20, 2025
HomeUncategorizedपरळी खोऱ्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; बनघर येथील महिला तसेच परळी गावातील...

परळी खोऱ्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; बनघर येथील महिला तसेच परळी गावातील युवक बाधीत

परळी :- जिल्हय़ात कोरोनाचे नवनवीन उच्चांक गाठत असताना बाधीतांच्या मृत्यूनेही जिल्हय़ावासीयांमध्ये धडकी भरत आहे. परळीगावासह भागात गेल्या काही दिवसांत झपाटय़ाने रुग्ण संख्या वाढत होती त्यामुळे आरोग्य विभागाने निटसवासीत तसेच संपर्कात आलेल्यांची अशा एकूण 16 जणांनची रॅपीड अंटींजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये बनघर येथील 28 वर्षीय महिला तर पानमळेवाडी येथे परळी येथील 18 युवक पॉझिटिव्ह आले आहेत. तरी बनघर येथील महिलेल्या हायरिस्क मधील 9 जन तर परळी येथील युवकाच्या हायरिस्क मधील 3 जन हे निगेटीव्ह आले आहेत. तसेच परळी खोऱयात एकूण 13 रुग्णसंख्या झाली असून एक खासगी तर तीन खावली येथे तर उर्वरित बाधीत हे होमआरोलेशन मध्ये आहेत.
परळी येथील रॅपीड अँटींजन टेस्ट करण्यात आली त्यातील 1 पॉझिटिव्ह तर 15 निगेटीव्ह आल्या असून यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. उर्मिला बनगर, लॅब टेक्निशियन भिसे, आरोग्य सहाय्यक एस.डी.गवते, उमेश गायकवाड, महेश भोसले, आरोग्य सेविका रंजना गावीत, आशा शिंदे, या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प घेण्यात आला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular