वार्ताहर
परळी
सातारा जिल्हय़ातील ऐतीहासीक वारसा म्हणून सज्जनगड हा किल्ला ओळखला जातो. आज देखील इतिहासाच्या पाऊल खुना याठिकाणी पहायला मिळतात. मात्र शहरातील दररोजच्या आयुष्याला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात पार्टी करण्याच्या मानसीकतेमुळे सज्जनगड परिसरात (पायरीमार्ग) मद्यपिंचा राजरोसपणे वावर हा वाढत आहे. तरी पोलीसांनी सज्जनगडसारख्या पवित्र अशा ठिकाणी मद्य प्राशन केले जाणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच संबंधीतांवर कारवाईची मागणी परळी खोऱयातील दुर्गप्रेमींनी करत आहेत.
परळी खोऱयातील निसर्ग संपदेमुळे शहरातील रटाळ आयुष्य जगणारे नागरिक हे या भागात फिरण्यास तसेच पार्टीच्या नियोजनानेच दाखल होत असतात. मात्र निसर्गाचा आनंद घेत असताना ऐतिहासीक जागेचे भान ही विसरत असल्याने मद्यपींचा धिंगाणा स्थानिकांना डोके दु:खी ठरत आहे. तसेच पोलीसांनी उरमोडी धरण परिसर, सज्जनगड पायरी मार्ग अशा ठिकाणी गस्त घालून ऐतिहासीक वास्तूची अवहेलना होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती परळी खोऱयातील दुर्गप्रेमी तसेच स्थानिक नागरिक करत आहेत.
पार्टीबहाद्दरांमुळे पायरी मार्ग परिसरात बाटल्यांचा खच
सज्जनगड पायरी मार्ग हा तसा कमी वर्दळीचा अन् निवांत त्यामुळे मित्रमंडळी गोळा करुन शहरातून पार्सल घेऊन या परिसरात पाटर्य़ांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मद्यप्राशनकरुन बाटल्या इतरत्र टाकणे तसेच खाण्यास घेवून गेगेल्या खाद्य पदार्थांचे कागद ही तसेच टाकले जात असल्याने परिसरात बाटल्या अन् कचरा दिसून येत आहे.