Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedसेवानिवृत्ती अभियंता पोरे यांची पंढरपूर व गोंदवले  सायकल भ्रमंती       ...

सेवानिवृत्ती अभियंता पोरे यांची पंढरपूर व गोंदवले  सायकल भ्रमंती             

सातारा  :  सध्या आधुनिक यंत्रसामुग्रीने  सुख प्रत्येक घरात नांदत आहे.  अशा वेळी व्यायाम व कष्ट नसल्याने  शारीरिक क्षमता कमी होत आहे. हुकमी उपाय म्हणून सायकीलिंगला महत्व आले आहे. त्याचाच भाग म्हणून म्हसवडचे सेवानिवृत्त अभियंते सुनिल पोरे हे दर दिवशी सायकीलिंग करून तरुणांसमोर आदर्श निर्माण करीत आहेत.

याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अभियंता सुनिल पोरे हे सहा वर्ष, शारीरिक चाचणी म्हणून दर चार महिन्यांला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी दि १४ एप्रिल मध्ये गोंदवले, दि १० डिसेंबर शिंगणापूर,  स्वातंत्र्य दिन दि १५ऑगस्ट रोजी   पंढरपूर तसेच नित्य नियमाने रोज १५ किलोमीटर सायकलींग करीत आहेत.                                       दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन म्हसवड या गावी स्थायिक बनले. दररोज पहाटे ५.३० घरातून सायकलवर बसून  ते भ्रमंती करीत असतात. आजूबाजूच्या गावातून सायलवरून  पंधरा किलोमीटर फेरफटका मारून ते दररोज सकाळी  साडे आठ वाजता परत म्हसवडला येत आहेत.म्हसवड येथील शुभम गॅस एजन्सीचा व्यवसाय सांभाळून ते आपला छंद जोपासत आहेत. सुनिल व सौ सुवर्णा पोरे  या पती पत्नीने जगभर भ्रमंती केली आहे.                     मित्रांच्या समवेत  देशातील निसर्गरम्य परिसरात निसर्गाचा आनंद घेताना ते मित्रांना सुध्दा आनंदी ठेवतात. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळी त्यांना ओळखणारे लोक त्याची चोख व्यवस्था करीत आहेत.या वयात सायकलवर भ्रमंती करणारे सुनिल पोरे म्हणजे ग्रामीण भागातील अभिनेते मिलिंद सोमण असे समीकरण बनले आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात. यासाठी त्यांची पत्नी सौ सुवर्णा पोरे, मुले ऍड करण पोरे, शुभम पोरे तसेच सुना, नातवंडे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहे.त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना अनेकजण करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular