Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीदै. ग्रामोद्धारच्या वृत्ताची दखल घेवून कोव्हिड लसीकरण मोहिमेला सुरुवात ; मेढा...

दै. ग्रामोद्धारच्या वृत्ताची दखल घेवून कोव्हिड लसीकरण मोहिमेला सुरुवात ; मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या योग्य निर्णयाचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

मेढा ( अभिजीत शिंगटे ) – मेढा ग्रामीण रुग्णालय यांचे वतीने स्थानिक नागरीकांना लसीकरण मोहीम राबवली जात असल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.
मेढा ग्रामीण रुग्णालयातून स्थानिक नागरीकांचे लसीकरणास प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा मेढा नागरीकांनी व्यक्त केली होती या आशयाची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती याबाबत योग्य तो निर्णय अधिकारी वर्गातुन झाल्यामुळे मेढा ग्रामस्थांना लसीकरणाला प्राधान्य देणारे मेढा ग्रामिण रुग्णालय, शासकीय अधिकारी वर्ग यांचे कौतुक होत असून ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेढा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सकाळी १०ते ५या वेळेत हि कोव्हिड लसीकरण मोहिम उपक्रम राबविला जात आहे. मेढा नगरीचे नगराध्ययक्ष पांडूरंग जवळ, माजी नगराध्यक्ष अनिल शिंदे, श्री. सुरेश शेलार , पत्रकार अभिजीत शिंगटे, मेढा नगरपंचायतीचे पदाधिकारी , भैरवनाथ मंडळाचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय मेढा आरोग्य विभागचे कर्मचारी व मेढा पोलिस स्टेशनचे सहकार्याने ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात येत आहे.

 

मेढा येथिल स्थानिक नागरीकांना प्रथम लस देण्यात यावी हि मागणी विविध स्तरावरून झाली आहे. मेढा नगरीतील लोकसंख्या पाहता लसीकरणास प्रथम प्राधान्य देणे हितकारक आहे .कोरोना रुग्णांची पॉझिटिव संख्या पाहता याची गरज आहे हे जरी खरे असले तरी ग्रामस्थ हि लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयाने आपले कर्तव्य बजावले असून नागरीकांनीही आपली जबाबदारी ओळखून शासनाने दिलेले नियमांचे काटेकोरपणे पालन करून लस घेवून प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाला हद्दपार करण्यास मदत केली पाहिजे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular