Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedविकेंडला केळवली हाउसफुल! विकेंड लॉकडाऊन असूनही 100 हून अधिक दुचाकी केळवली...

विकेंडला केळवली हाउसफुल! विकेंड लॉकडाऊन असूनही 100 हून अधिक दुचाकी केळवली दाखल

 

वार्ताहर
परळी
निसर्गाचा वरदहस्त असलेले आपले परळी खोरे. या ठिकाणी नाना विविध प्रकारच्या दुर्मिळ आशा प्राण्यांच्या जाती आढळतात. पावसाळा आला की परळी खोऱ्याच रूप हे पुन्हा खुलतं अन् हे खुललेलं निसर्गाचे रूप याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांचा लोंढा या भागात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. सध्यास्थितीत सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा स्थिरावलेला असला तरी जिल्ह्यावरील कोरोणाचे संकट अजूनही टळलेले नाही. यामुळे विकेंडला लॉकडाऊन सुरू आहे मात्र याच कालावधीत केळवली धबधबा परिसर पर्यटकांनी हाऊसफुल होत आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या बोगद्यातून सज्जनगड परळी मार्गे केळवली धबधब्याकडे जाण्यास मार्ग आहे. परळी येथे आल्यानंतर किल्ले सज्जनगड तसेच उरमोडी जलाशयाचे विहंगम दृश्य त्याचबरोबर तेथून पुढे प्रवास करत या धबधब्याकडे जावे लागते. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा मंदावला आसल तरी सध्या तिसऱ्या स्तरांमध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश होत असल्याने काही नियम शिथिल करण्यात आले आहेत मात्र विकेंडला संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सोडून लॉकडाऊन करण्यात येतो. कास ठोसेघर या परिसरावर चेक नाका असल्याने या ठिकाणी पर्यटकांची रीघ थोडी कमीच दिसते. मात्र परळी खोऱ्यातून केळवली सांडवली या धबधब्याकडे जाताना कोणतेही पोलीस चौकी वा तपासणीचा कोणताही त्रास हा भासत नसल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओढा हा जास्त दिसून येत आहे.

 

 

*केळवली बनले वाहनतळ*

पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपले रुपडे पालटतो आणि हेच रूपडे पालटले पाहण्यासाठी हजारो पर्यटक हे परळी खोऱ्यात दाखल होत असतात. मात्र कोरोनाचे संकट असल्याने या प्रमाणात घट झाली असली तरी ठोसेघर-कास या ठिकाणी पोलिसांचा त्रास जाणवत असल्याने परळी खोऱ्यातून केळवली सांडवली या धबधब्याकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा असल्याचे समजताच शनिवार-रविवार गाठून सातारकर हे या ठिकाणी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पोहोचत असल्याने केळवली गावाला अक्षरशा वाहनतळाची स्वरूप प्राप्त झाले आहे.

 

*परळी केळवली मार्गावरही वाहनधारकांची चौकशी व्हावी*

  • विकेंडला कास ठोसेघर या मार्गावर पर्यटकांना अटकाव घालण्यासाठी पोलीस तपासनी ही होत आहे. मात्र परळी खोऱ्यात पर्यटक हे राजरोसपणे येऊन उच्छाद मांडत असल्याने या ठिकाणीही पोलीस चौकी उभारून वाहनधरकांची कसून तपासणी करावी अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular