प्रतिनिधी
आनेवाडी
न्यु इंग्लिश स्कुल, पवारवाडी मध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचत्य साधुन विशेष प्राविण्य मिळावलेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणाप्रती तळमळ असणाऱया आणि सामाजातील दानशुर व्यक्तीच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो. या वेळी कै. रामचंद्र भाउ वारागाडे यांच्या स्मरणार्थ कु. साक्षी धुमाळ हिचा इयत्ता दहावी मध्ये सायगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविल्या बददल बक्षिस, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या.