Thursday, June 19, 2025
Homeकरमणूकजॉन-सोनाक्षीच्या फोर्स 2 चा ट्रेलर

जॉन-सोनाक्षीच्या फोर्स 2 चा ट्रेलर

अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या अ‍ॅक्शनपट असलेल्या फोर्स 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये हे दोन्ही कलाकार जबरदस्त स्टंट करताना दिसतात. अभिनय देवच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झालेल्या फोर्सफचा सिक्वल आहे. तर दुसरीकडे अकिरा चित्रपटातनंतर सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती एका रॉ एजन्टची भूमिका साकारत आहे.
जॉन अब्राहमने फोर्स 2 चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. नुकताच चित्रपटाचा पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरवर रॉ ट्रूथ असे लिहण्यात आले आहे. हा पोस्टर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवणारा आहे. देशाच्या रक्षणासाठी प्राण देऊनही ओळख न मिळालेल्या शूरवीरांना हा चित्रपट समर्पित केल्याचे ट्रेलरच्या सुरुवातीला दाखविण्यात आले आहे. जिथे फोर्सफ चित्रपटाची कथा संपली होती. तिथूनच फोर्स 2 ची कथा सुरु होईल असे म्हटले जातेय. काही दिवसांपूर्वीच जॉन आणि सोनाक्षी त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता कपिल शर्माच्या शोवर गेले होते. फोर्स 2 चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जॉन अब्राहमला ब-याचदा दुखापतींना सामोरे जावे लागले होते. त्याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिनदा सर्जरी करावी लागली होती. त्या दरम्यान त्याच्या दोन्ही हातांना आणि पाठीलाही दुखापत झालेली. या चित्रपटापूर्वी सोनाक्षी सिन्हाने ए आर मुर्गदास यांचा अकिरा
हा चित्रपट केला होता. यात तिने महिलांवर होणारा अत्याचार आणि हिंसा याविरुद्ध लढणा-या मुलीची भूमिका साकारली होती. तुम्ही यापूर्वीही असे चित्रपट पाहिले असतील. पण सोनाक्षीने या चित्रपटात दिलेले जबरदस्त असे अ‍ॅक्शन सीन हा यातील फरक होता

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular