Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीशिवेंद्रराजेंवर टीका करताना आपली स्वत:ची उंची तपासून टीका करावी अन्यथा......

शिवेंद्रराजेंवर टीका करताना आपली स्वत:ची उंची तपासून टीका करावी अन्यथा……

नगर विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांचा नगरसेवक वसंत लेवे यांना इशारा
सातारा : आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका करताना आपली स्वत:ची उंची तपासून टीका करावी अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असा खरमरीत इशारा आज सातारा येथील आयोजित पत्रकार परिषदेत नगर विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी नगरसेवक वसंत लेवे यांना दिला आहे. यावेळी नविआचे नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, विनोद खंदारे, माजी नगरसेवक प्रविण पाटील, अविनाश कदम व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक अविनाश कदम म्हणाले की, सातारा नगर पालिकेच्या निवडणूकीत जनतेने नगर विकास आघाडीला दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसापासून याबाबत पेपरबाजी फार होऊ लागली आहे. गोखले हौद सुशोभिकरणासाठी 2012 साली खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांची स्टँडीग कमिटीने मंजूरी दिली होती. मात्र 2012 ते 2015 या तीन वर्षात सुशोभिकरणासाठी कोणतेही पैसे आलेले नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांनी लोकसहभागातून गोखले हौदाच्या सुशोभिकरणासाठी अर्ज दिला. 22-06-15 ला सर्वसाधारण सभेकडे हा अर्ज  पाठविला. 6-8-2015 ला  139 व्या ठरावाने मी स्वत: सुचक म्हणून व अनुमोदक सुजाता गिरी-गोसावी यांच्या सहीने ठराव मंजूर झाला. मात्र निवडणूक लागल्याने हे काम होऊ शकले नाही. 9-12- 16 ला मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांनी सुशोभिकरण करणेबाबत बारनिशीत पत्र दिले. 2012 साली जर गोखले हौदासाठी मंजूरी मिळाली होती. मग आजपर्यंत पैसे का आले नाहीत? आणि या कामाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नका. तसेच खासदार निधी अविनाश कदमांनी रोखला असे तुम्ही बोलता, मात्र जो निधी गोखले हौदासाठी मंजूर झाला  होता त्याचा पाठपुरावा तुम्ही केलेला नाही त्याचा दोष तुम्ही आम्हावर का लादता. मी 6 वेळा निवडणूक लढल्या त्यात 4 वेळा मी पराभूत झालेलो आहे. त्यामुळे पराभव पचविण्याची ताकद माझ्यात आहे. मला सांगायची गरज नाही. आमदारांवर आरोप करताना स्वत:ची उंची बघावी, अन्यथा जशास तसे उत्तरे देऊ, हाणामारीची भाषा करता तर आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी काय बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांतता हवी आहे असाही त्यांनी टोला दिला. यावेळी नविआचे जेष्ठ पदाधिकारी व नगरसेवक अशोक मोने म्हणाले, वसंत लेवे यांनी गेली 20 वर्षे  नगर विकास आघाडीची पदे भोगली. कै.भाऊसाहेब महाराजांनी यांनी लेवे यांना शब्द तुम्हाला नगराध्यक्ष पद देवू त्यांच्या शब्दांमुळे मनोमिलनानंतर त्यांची पत्नी सौ. निवडून आल्यानंतर त्यांना नगराध्यक्षपद दिले गेले होते. आज सर्व पदे भोगायची आणि स्वार्थापोटी सातारा विकास आघाडीमध्ये जाऊन टीका आणि बेताल वक्तव्ये करायची हे तुम्हाला शोभत नाहीत.
यावेळी योगेश चोरगे म्हणाले की, आतापर्यंत सातार्‍यात दहशत लेवेंचीच होती. माझ्यावर जी टीका झाली. यात कोणतेही तथ्य नाही. जे गुन्हे दाखल ते राजकीय स्वार्थापोटी झाले. मी आजपर्यंत सामाजिक कार्यात स्वत:ला झोकुन दिले आहेत. इथुन पुढेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली माझी वाटचाल सुरूच राहील. माझ्यावर आरोप करताना आपण स्वत: काय आहोत हे तपासून पहा. यावेळी नविआचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसंत लेवे यांचा जाहिर निषेध केला.
खंदारे नामक नगरसेवकाने तोडले अकलेचे भलतेच तारे
नगर पालिकेत येवून बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना थेट उकीरड्यावर बसविण्याची भाषा करणार्‍या बाळ्याचा बाळासाहेब म्हणविणार्‍या खंदारे नामक नगरसेवकाने नगर विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत अकलेचे भलतेच तारे तोडले. ते तारे तोडताना राजकीय क्षेत्राचा अनुभव नसल्याने, त्यांची बेताल बडबड ऐकण्याची वेळ पत्रकारांवर आली. पत्रकारच या प्रकरणाला जास्त पेटवत असल्याचा बाष्कळ आरोप या नगरसेवकाने केल्याने अनेक पत्रकारांचा पारा चढला. त्यांनी बाळु खंदारे यांच्या वक्तव्याचा निषेध करत पत्रकार परिषदेतून वॉक आऊट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा खंदारेच्यावतीने नगर विकास आघाडीच्या सर्वच नगर सेवकांनी पत्रकारांची माफी मागितली. पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, आणि त्यांच्या सहकार्‍यांनी झाल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. अद्याप गॅझेट प्रसिध्दी होणे बाकी असताना मेहरबान पदाची हळदी अंगाला काय लागली, खंदारेंच हळकुंड लगेच पिवळं झाल. पालिकेत पाच-पाच टर्म काढणार्‍या नगरसेवकांनी कधी पत्रकारांचा उपमर्द केला नाही, अगदी आमदार शिवेंद्रराजे भोसले सुध्दा पत्रकारांशी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागतात असे असताना अलिकडच्याच काळात राजकारणातला नुकताच राजकीय मिसरूड फुटलेला मल्हारपेठेचा हा नगरसेवक पत्रकारांनाच अक्कल शिकवितो. हे न समजण्या पलिकडचे आहे तेव्हा नविआचे जेष्ठ नगरसेवक अशोक मोने यांनी आपल्या आघाडीतल्या नवशिक्या नगरसेवकांसाठी आमदारांच्या परवानगीने एक राजकीय कार्यशाळा ठेवावी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular