सातारा : दि. 14 डिसेंबर 2016 रोजी नागपूर येथे मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या नागपूरच्या मोर्चात आम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याने, नोंटाबंदीमुळे होणार्या अन्वनित हाल शासनाच्या निदर्शनास आणण्याकरीता काढण्यात येणारा नियोजित मोर्चा दि. 14 डिसेंबर 2016 ऐवजी दिनांक 17 डिसेंबर 2016 रोजी ठिक सकाळी 11.00 सातारच्या गांधी मैदान येथुन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल.
नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य व्यक्तींसह,शेतकरी, कामगार,कष्टकरी,लघुउद्योजक आदींनी या मोर्चाच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद घेवून, दिनांक 17 डिसेंबर 2016 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे माहिती वजा आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जनतेला केले आहे.