कराड ः कर्हाडमध्ये मोठ्या दिमाखात साजर्या होणार्या विजय दिवस समारोहास शोभा यात्रेने बुधवारी प्रारंभ झाला. त्यामध्ये विविध शाळांच्या चित्ररथांनी आबालवृध्दांचे लक्ष वेधले. शहरातुन काढण्यात आलेल्या या चित्ररथाने विजय दिवस समारोहाची चांगलीच वातावरण निर्मीती झाली.
भारताच्या बांग्लादेश विजयाप्रित्यर्थ येथे निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतुन येथे विजय दिवस समारोह साजरा केला जातो. यंदाचे हे 19 वे वर्ष आहे. समारोहास आज सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने प्रारंभ झाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते त्यास प्रारंभ झाला. यावेळी वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, डॉ. अशोकराव गुजर, उद्योजक रवळनाथ शेंडे, शंकराप्पा संसुद्दी, अॅड, संभाजीराव मोहिते, अरुण जाधव, विनायक विभुते व मान्यवर उपस्थित होते. शोभायात्रेत पालिका शाळा क्रमांक नऊने शहीद जवान, पालिका शाळा क्रमांक सात आणि शिवाजी विद्यालयाने पर्यावरण विषय जनजागृतीपर, विठामाता विद्यालयाने वीर जवान, अॅग्लो उर्दु स्कुलने स्त्री सक्षमीकरण, शाहीन विद्यालयाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र हायस्कुलने पर्यावरण काळाची गरज, संत तुकाराम हायस्कुलने संतदर्शन आदि चिरत्रथ केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा आदि व्यक्तीरेखाही कलाकारांनी साकारल्या. शहरातुन सवाद्य काढण्यात आलेल्या या शोभा यात्रेने विजय दिवस समारोहाची चांगलीच वातावरणनिर्मीती झाली. शोभायात्रेचे नेटके नियोजन अॅड. परवेज सुतार, रत्नाकर शानभाग, चंद्रकांत जाधव, सागर जाधव, शंकरराव डांगे, गणपतराव कणसे, अॅड संभाजीराव मोहिते, विलासराव जाधव, संभाजी कणसे आदिंनी केले.
शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या उदघाटन झाले. यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे, अरुण जाधव, विनायक विभुते, रणजीत जाधव, चंद्रकांत जाधव, श्रीमती अरुणा जाधव, अॅड. संभाजीराव मोहिते, अॅड. परवेज सुतार, श्री. कुंभार, आनंदराव लादे, सैन्यदलाचे अधिकारी आदि उपस्थित होते. प्रदर्शनात भारतीय व परदेशी बनावटीची शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. त्यामथ्ये रडार, हवेत मारा करणारी गण यासह विविध प्रकारच्या बंदुकांचा समावेश आहे.