सातारा ः कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या बांधकाम क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या सातारा सेंटरच्या अध्यक्षपदी सलग दुसर्यांदा श्रीधर कंग्राळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब ठक्कर, सेक्रेटरीपदी सुधीर शिंदे, जाईंट सेके्रेटरीपदी मजिद कच्छी, ट्रेझररपदी निकम व जाईंट ट्रेझररपदी मंगेश वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सातारा येथे झालेल्या जनरल बॉडी मिटींग मध्ये क्रेडाई सातारा सेंटरच्या पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. क्रेडाई सातारा सेंटरच्या कमिटी मेंबर्समध्ये सुधीर घार्गे, राहुल वखारिया, दिपक पाटील, अमेय आगटे, सागर साळुंखे, शकील सय्यद, बाळासाहेब शिरकांडे, नंदकुमार फडके, अनुप पोरे यांची तर वर्कींग कमिटी मेंबरपदी सागर प्रभाळे, इर्शाद इनामदार, अभिजित पाटील, सचिन आगाणे, सतिश कोर्टिल, अनिल जाधव व भरत जैन यांची निवड करण्यात आली.
क्रेडाई सातारा सेंटरची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली होती. रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे अनेक प्रश्न क्रेडाईच्या माध्यमातून सोडवले जातात. क्रेडाई ही रिअल इस्टेट डेव्हलपर्सची भारतातील सर्वात मोठी संस्था असून देशभर पसरलेल्या या संस्थेच्या महाराष्ट्रात 40 हून अधिक शहरामंध्ये क्रेडाईच्या शाखा असून 2500 हून अधिक रिअल इस्टेट डेव्हलपर्स क्रेडाईचे सदस्य आहेत. एकूण बिल्डर्स व डेव्हलपर्सच्या संख्येच्या 75 टक्क्यांहून अधिकजण क्रेडाईचे सदस्य आहेत.पदाधिकार्यांच्या निवडीबद्दल अनेक बिल्डर्स, डेव्हलपर्स यांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत केले.
क्रेडाई सातारा सेंटरच्या अध्यक्षपदी श्रीधर कंग्राळकर यांची निवड
RELATED ARTICLES