सातारा : शनिवारी रात्री महेश पाटील वनक्षेत्रपाल सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर आवळे वनपाल सातारा, सुहास भोसले वनरक्षक सातारा, मारुती माने वनरक्षक कण्हेर, अमर शिंदे वनरक्षक धावली, गोरख शिडतुरे वनमजूर सातारा यांनी सापळा रचून मौजे गोवे येथे 3.45 वाजता रान मांजराची शिकार केलेले गौतम सुरेश जाधव व सुनिल राजाराम गोसावी असे दोन आरोपी एक मृत वनमांजर व सहा शिकारीचे सापळे ताब्यात घेतले. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची वन कोठडी दिली.
रानमांजराचे पशु वैद्यकीय अधिकार्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर गोडोली येथील रोपवाटिकेत दहन करण्यात आले.