मायणी :(सतीश डोंगरे ) मायणी येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या ब्लॉसम इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा व छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत गस्त पुस्तकातील शौर्य विशेषांकातील विजय लोहार यांच्या विशेष लेखाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला .
या संपूर्ण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन शंकर शिवाजी माळी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. पांडरंग लोहार सर होते .या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन व मायणीचे उपसरपंच अॅड .सूरज पाटील ,डॉ. सयाजी पवार ,डॉ. उदय माळी डॉ. सोमनाथ कुंभार, डॉ. अमोद चोथे,जालिंदरशेठ माळी ,पत्रकार प्रकाश सुरमुख व धनंजय क्षीरसागर,ग्रा.पं. सदस्या सौ. विद्या काबुगडे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी विद्यार्थी -विद्यार्थीनींनी सादर केलेल्या उत्तम प्रकारच्या नृत्य -अभिनयादी कलाकृतीमुळे उपस्थित पालकांची मने भारावून गेली. मायणीच सुपुत्र विजय लोहारसा यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील शौर्य विशेषांकातील लेखाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले .या उत्कृष्ट लेखाबद्दल विजय लोहार सरांचे उपस्थितांनी कौतुक व अभिनंदन केले .या प्रसंगी ह. भ.प. पांडुरंग लोहार, डॉ. एस एन पवार, पत्रकार धनंजय क्षीरसागर आदी मान्यवरांनी आपले मनोगते व्यका केली .संस्थेचे चेअरमन शंकर माळी यांनी गेल्या आठ वर्षांतील संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला . मायणीव परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . मायणीतील प्रतिष्ठीत डॉ. उदय माळी यांनी शाळेसाठी सरस्वती देवीची मूर्ती शाळेस भेट दिली .विद्यालयाचे उपशिक्षक एस .डी. कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले .संस्थेचे व्हा.चेअरमन अॅड. सुरज पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले
ब्लाॅसम इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा संपन्न
RELATED ARTICLES