Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसंदीपदादांच्या समर्थनार्थ 107 पदाधिकार्‍यांचे सामुहिक राजीनामे

संदीपदादांच्या समर्थनार्थ 107 पदाधिकार्‍यांचे सामुहिक राजीनामे

रहिमतपूर: मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी पक्ष सदस्यत्त्व आणि पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख 107 पदाधिकार्‍यांनीही आपापल्या पदांचे सामुहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधितांनी हे राजिनामे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले असून पदाधिकार्‍यांच्या राजीनामासत्रामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेवकाका माने यांच्या अध्यक्षतेखाली रहिमतपूरमध्ये आज झालेल्या तातडीच्या बैठकीत सामुहिक राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीतील चर्चेविषयी मनसे जनहित कक्षाचे जिल्हा संघटक मनोज माळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमचे नेते, मनसेचे राज्य उपाध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रमुख संघटक संदीपदादा मोझर यांनी नुकताच त्यांच्या पदाचा व पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पडत्या काळात कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पक्षीय धोरणावर पश्‍चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोमाने उभी करण्याचा चंग बांधून सक्रीयपणे पक्षाचे कामे केले. मात्र त्यांच्या राजिनाम्यामुळे आम्हीही पक्षत्याग करत आहोत. पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने उभी करुन ती तडीस नेण्यास त्यांनी तन, मन, धनाने अहोरात्र कष्ट घेतले. पक्षाच्या एवढ्या मोठ्या नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ येत असेल तर ही बाब संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र, सातारा जिल्ह्यासाठी आणि एकूणच पक्षासाठी घातक व विचार करण्यासारखी आहे. संदीपदादा मोझर यांनी स्वत:हून अन्य सर्व पदाधिकार्‍यांनी पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्यांनी निर्णय जाहीर करुन तीन दिवस उलटले तरी पक्षातील जबाबदार व वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया व्यक्त होत नाही तसेच विचारणाही केली जात नाही.
या पत्रकावर वासुदेवकाका माने, मनोज माळी यांच्यासह बाळासाहेब बाबर, बाळकृष्ण पिसाळ, सुभाष चौधरी, सागर पवार, सागर केंजळे, चंद्रकांत पवार, मधुकर जाधव, अश्‍विन गोळे, अविनाश दुर्गावळे, सौ. मनिषा चव्हाण,  स्वामी माने, दिलीप सुर्वे, विजय पंडित, रमेश सावंत, मिलिंद खामकर, रामदास वाघचौडे, गणेश भोसले, सुशील कदम, संदीप जाधव, भानुदास दाईंगडे, राजेंद्र वाळवेकर, आदित्य देसाई, मोहन वाडकर, नारण सणस, दिलीप सुतार, आकाश मोरे, दत्तात्रय करंजेकर, राजेंद्र बर्गे, पद्मावती पाटील, संजय तांबे,अमित यादव, शशिकांत महाडिक आदींसह मनसेच्या सर्व आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular