साताराः सातारा तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणा-या जनता सहकारी बँकेच्यावतीने केरळ पूरग्रस्तांना 21 हजारांचा मदतनिधी देण्यात आला. मदतीचा धनादेश जनता सहकारी बँकेचे संचालक, कर्मचारी संघाचे पदाधिकारी व सेवकांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
जनता सहकारी बँक ही नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. आतापर्यंत देशात, राज्यात ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा जनता सहकारी बँकेने नेहमीच मदतनिधी देण्यात पुढाकार घेतला आहे. केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील पूरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी बँकेच्यावतीने 21 हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. या मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी, बँकेचे चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, ज्येष्ठ संचालक आनंदराव कणसे, माधव सारडा, प्रशासन अधिकारी मच्छिंद्र जगदाळे, जनता बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ डॅनी पवार, उपाध्यक्ष हणमंत उबाळे, खजिनदार अनिल जठार, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र साळुंखे, उमेश पाटील, निळकंठ सुर्ले हमीद शेख, बँकेचे अधिकारी, सेवक वर्ग उपस्थित होते.
जनता सहकारी बँकेच्यावतीने केरळ पूरग्रस्तांना मदतनिधी
RELATED ARTICLES