Friday, March 29, 2024
Homeसातारा जिल्हापाटणमुलांच्या समोर राष्ट्राची संस्कृती जपली तरच भावी पिढीकडून ती जपली जाईल.- श्रीमती...

मुलांच्या समोर राष्ट्राची संस्कृती जपली तरच भावी पिढीकडून ती जपली जाईल.- श्रीमती सुहासिनी पिसाळ ; फुलराणी बालक मंदिरात दहिहंडी उत्सव, शिक्षकदिन उत्साहात साजरा.

पाटण:- आजच्या मुलांच्या समोर या राष्ट्रातील पारंपरिक संस्कार आणि संस्कृती जपली तर भावी पिढीचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. मुले शाळेत जातात म्हणजे पालकांची जबाबदारी संपली असे होत नाही तर शिक्षकांच्या बरोबरीने पालकांनी ही या मुलांना या देशातील पारंपरिक उत्सव, सन-वार आणि संस्कृतीचे धडे दिले पाहिजेत. तरच या देशाची संस्कृती भावी पिढी कडून जपली जाईल. असे प्रतिपादन फुलराणी बालक मंदिराच्या संस्थापिका श्रीमती सुहासिनी पिसाळ यांनी फुलराणी बालक मंदिरातील लहान मुलांच्या दहिहंडी उत्सव आणि शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

पाटण येथील फुलराणी बालक मंदिरातील लहान मुलांनी दहिहंडी उत्सव आणि शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला त्यावेळी संस्थापिका श्रीमती सुहासिनी पिसाळ बोलत होत्या. या कार्यक्रम उत्सवासाठी फुलराणीच्या शिक्षिका अपर्णा धामणकर यांनी निटनेटके नियोजन करून लहान मुलांचा उत्साह व्दिगुणित केला.
दहीहंडी उत्सवासाठी फुलराणी बालक मंदिरातील लहान मुलांनी राधा – कृष्णा चा पारंपरिक वेशभूषा परिधान करून गोकुळ अष्टमीची गाणी गायली. आणि दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. तर शिक्षकदिनानिमित्त मधुरा जाधव, आर्या मोळावडे, आर्या संकपाळ, समिक्षा साळुंखे, पवन देशपांडे, शुभम शिर्के आदी मुलांनी आपल्या पालकांसमोर शिक्षक होण्याचा अनुभव अनुभवला. या कार्यक्रमास फुलराणी बालक मंदिरातील विद्यार्थी – विद्यार्थीनीं बरोबर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular