सातारा :कराड येथे पत्रकार भवन बांधण्यात आले आहे. पण, या भवनाच्या कामात मोठा भ्रष्ट्राचार करण्यात आला आहे. त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी पत्रकार पराग शेणोलकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांना निवेदन दिले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने कराड नगरीत सुसज्ज असे पत्रकार भवन उभे राहिले आहे. या पत्रकार भवनाच्या बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असून काही बेकायदेशीर गोष्टी घडल्या आहेत. अशी धारणा झाल्याने कराड येथील पत्रकार पराग शिणीलोकर हे गेली दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. काल पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार उपस्थित असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार गोरख तावरे, शशिकांत पाटील, देवदास मुळे,अशोक चव्हाण, सचीन शिंदे, सतिश मोरे व इतर पत्रकार उपस्थित होते
कराड पत्रकार भवन भ्रष्टाचार चौकशीची पत्रकार दिनीच मागणी
RELATED ARTICLES