कोरेगाव : स्वराज्य निर्मितीत ज्या गड-किल्ल्यांनी आपली सिध्दता दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील एक चांगले राज्य निर्माण केले, त्या गड किल्ले स्वच्छता व संवर्धनासाठी सोनरी ग्रुपने हाती घेतलेला उपक्रम निश्चितच गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन कोरेगांवचे माजी सरपंच, अॅड. प्रभाकर बर्गे यांनी व्यक्त केले.
येथील कैसर-ई-हिंद बुवासाहेब बाळासाहेब बर्गे स्मृती समितीच्या वतीने कै. मिरदेव गायकवाड वाचनालयाने सोनेरी ग्रुपच्या सामाजिक कार्याचा विशेष पुरस्कार देवून सन्मान केला, त्याप्रसंगी अॅड. बर्गे बोलत होते. महाराष्ट्र युवक वारकरी महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. अमोल महाराज जाधव, प्राचार्य अरुण बर्गे, वाचनालय समितीचे अध्यक्ष बा. दि. बर्गे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. प्रभाकर बर्गे पुढे म्हणाले, गेली 20 वर्षे सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून सोनेरी ग्रुपने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. या ग्रुपचे संघटन अतिशय प्रभावी असून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर जावून तेथील स्वच्छता करण्याचा उपक्रम निश्चितच आदर्शवत आहे, या उपक्रमाचा कोरेगांवकरांकडून होत असलेल्या या सन्माचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालय समितीचे अध्यक्ष बा. दि. बर्गे यांनी केले, तर सुधाकर वेळापूरे यांनी स्वागत केले. अॅड. दिपक बर्गे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सोनेरी ग्रुपच्या माध्यमातून यापुढील काळातही अनेक विधायक उपक्रम हाती घेणार असल्याचे सांगितले. एका चांगल्या कामाचा कोरेगांवकरांनी केलेला हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी व पाठबळ देणारा असल्याचेही ते म्हणाले.
विशेष गौरव स्विकारताना सोनेरी ग्रुपचे पृथ्वीराज बर्गे, अभिजीत बर्गे, मिलींद बर्गे, रुपेश जाधव, सुभाषराव जाधव, हेमंत जाधव, पै. अनिल रोमण, अशोकराव भोसले, सत्यजीत सानप, अमर देशमुख, अधिक बर्गे, वेदांत बर्गे आदींसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
सोनेरी ग्रुपचा गड-किल्ले स्वच्छतेचा उपक्रम गौरवास्पद : अॅड. प्रभाकर बर्गे
RELATED ARTICLES