सातारा : दि. 2 ते 9 जानेवारी 2017 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 62 व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये कु. अंकिता अरुण जाधव हिने ब्राँझ मेडल प्राप्त केले आहे. त्याआधी नाशिक येथे झालेल्या राज्य स्तरीय शालेय स्पर्धेमध्ये टॅग-सुडो व जित-कुनडो या मार्शल आर्ट प्रकारात दोन सुवर्ण प्राप्त केले.
या यशाबद्दल तिचे शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष बबनराव उथळे, राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गचे अधीक्षक प्रदीप वाळंजकर, राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारचे अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर, ग्रामोध्दारचे व्यवस्थापकीय संपादक चंद्रसेन जाधव, लाल बहादूर शास्त्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, जि. प. माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, प्रशिक्षक विजय खंडाईत व निलेश कुमठेकर, समर्थगाव (अतीत)चे सरपंच विजय धारेराव, ग्रामस्थ शंकर जाधव, राम शिंदे, बळीराम जाधव, राम शिरटावले, गणपत जाधव, अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लोहार, आबा लाड, सिनेस्टार समृध्दी जाधव, आजी-माजी सैनिक संघटना जिल्हा सातारा, पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, सीमा सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष मोहन धोंदवड, प्रा. विनय भोई तसेच अंकिता हिचे वडील अरुण जाधव यांचे मित्र परिवार यांनी तिचे अभिनंदन केले.
त्याआधी जिल्हा सैनिक कार्यालय सातारा व सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तिचा दि. 7 डिसेंबर 2016 ध्वजदिनादिवशी रोख रक्कम 10 हजार व प्रशस्तीपत्रक देवून जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांच्या हस्ते विशेष गौरव पुरस्कार देवून गौरव केला. तसेच दि. 15 जानेवारी 2017 रोजी जिल्हा क्रिडाधिकारी सातारा यांच्याकडून खाशाबा जाधव पुरस्काराने तिला गौरवण्यात आले.