सात लाखाचा ऐवज जप्त; 33 जणांवर कारवाई
औंध : बुधवारी रात्री औंध येथील जुगार अड्डयावर छापा मारून सातारा येथील पोलीस पथक, औंध पोलीस पथकाने जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पणे कारवाई करून जुगार अड्डयावरील रोख रक्कमेसह सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करून 33जणांवर कारवाई केली.
याबाबतची अधिक माहिती अशी औंध ते गोसाव्याचीवाडी रस्त्यावरील गव्हाळा तलावानजीक शेतामध्ये असणार्या हणमंत शिंदे यांच्या राहत्या घरामध्ये बिगर परवाना तीन पानी पत्याचा जुगार क्लब सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक शशिकांत भोसले , दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे,औधचे सपोनि विकास जाधव, यांनी सातारा व औंध पोलीस पथकांमार्फत संयुक्त पणे छापा मारून 33 जणांविरोधात कारवाई केली. त्याचबरोबर जुगार अड्डयावरील रोख 1 लाख 87 हजार 687 रुपये,65हजार रुपये किंमतीचे 20मोबाईल,4लाख40हजार रुपये किंमतीच्या 4मोटरकार,7दुचाकी गाडया असा एकुण सुमारे सात लाखाचा ऐवज पोलीसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद प्रशांत पाटील यांनी औंध पोलिस स्टेशनला दिली आहे. सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशन मध्ये झाली आहे.