सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांचे सर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांनी आज फेटाळले. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे गटाला मोठा धक्का बसला आहे. खासदार समर्थकांच्या जामीन अर्जावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. आनेवाडी टोल नाक्याच्या हस्तांतरणावरून खासदार श्री छ. उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटात कोजागिरी पोर्णिमेरात्री जोरदार धुमश्चक्री झाली होती. त्यामध्ये दोन्ही बाजूकडील 18 जणांना आजपर्यंत अटक झालेली आहे. आज दुपारी आमदार समर्थकांनी जामीनासाठी तर बाहेर असलेल्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले सर्व अर्ज न्यायाधीश आर डी देशपांडे यांनी फेटाळले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाला धक्का ….. समर्थकांचे जामीन अर्ज फेटाळले
RELATED ARTICLES