सातारा : येथील नगर परिषदेने शहरातील नागरिकांवर बेकायदेशीर वाढीव घरपट्टीचे संकटच आणले आहे. समाान्य सातारकरांना आवश्यक असेलील वीज आणि पाणी हे कधीच सरुळीत पुरवले जात नाही. शहरातील व परिसरातील रसत्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यावर केवळ मलमपट्टी करुन ठेकेदारांचे घर भरायचे काम सुरु आहे. याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने आज तालीम संघ ते सातारा नगरपालिका असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी वाढीव घरपट्टीबद्दल नगर पालिकेचा निषेध करण्यात आला.
पालिकेने जी घरपट्टी वाढ मागील 3 वर्षापासून केली आहे. तीच मुळात बेकायेदशीर आहे. पालिकेची ही करवाढ 1 एप्रिल 2014 पासून आहे. वास्तविक 31 मार्च 2016 पयर्ंत सर्व कर भरला असूनही 1 एप्रिलपासून कर वाढ करुन सर्व थकबाकीदारांना बनविले आहे. या पूर्वीचे मूल्यांकन हे सन 2009 2010 मधील आहे. त्यास 5 वर्षे पूर्ण झाली आहेत.
मूल्यांकन एप्रिल 2014 मध्ये आवश्यक होते. मात्र त्यावेळी विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून ते केले गेले नाही. ते मूल्यांकन 2016 मध्ये करुन 2 वर्षाची करवाढ नागरिकांच्या माथी मारली आहे. राज्य शासनानेही करवाढीचे तसे आदेश पालिकेला दिले नसताना ही करवाढ बेकायदेशीर आहे. म्हणून ही करवाढ पूर्णपणे रद्द करावी अशी मागणीु करत आज भाजपने तालीम संघ मेैदान ते पालिका कार्यालय दरम्यान आज सातारकर नागरिकांचे समवेत मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुनील काळेकर, नगरसेविका सुवर्णा पाटील, किेशोर गोडबोले, हेमांगी जोशी, विठ्ठल बलशेटवार, आपटे तसेच अनेक नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होतें.